आज माझ्या लेकीला प्रचंड आवडते म्हणून खीर केली शेवयांची, सगळा भरपूर सुकामेवा केशर ई. घालून. पण मी जेव्हा हे करायचं ठरवलं तेव्हा थोडासा उशीर झाला होता. एकदा वाटलं उद्या करूयात पण "टुमारो नेव्हर कम्स" बरोबर कि नाही ? म्हणून लागले कामाला आणि कधी पट्टदिशी खीर तय्यार झाली चविष्ट चवदार अशी ते कळलं देखील नाही माझं मलाच. असो.
ह्या माझ्या सगळ्या गोंधळामुळे आणि खीर थोडी गार होण्यासाठी ती फ्रिज / फ्रिझर मधे ठेवण्याचा विचार आला मनात. पण इतकं गरम कसं ठेवायचं आत म्हणून मग खीर केलेलं भांड थंड पाण्यात ठेवलं, एक दोनदा बदललं पाणी आणि त्यामुळे खीर पट्टाकिनी रूम टेम्परेचर ला आली आणि मग ती मी फ्रिज मधे ठेवली. थंड पाण्यात जेव्हा मी खिरीचे भांडे ठेवले आणि सतत हलवत होते, सावकाश फुंकर मारत होते, पंखा सुरु केला ई. गार पटकीनी व्हावं म्हणून तेव्हा एक छोटासा विचार आला, म्हटलं चला मांडावा इथे.
सगळ्यांनाच मस्त चविष्ट खीर थंडगार पद्धतीने खाता यावी म्हणून आणि गरम पणा खिरीतला निघून जावा पट्टाकिनी म्हणून माझे चहू बाजूनी प्रयत्न सुरु होते, वरून पंखा / फुंकर, खाली आणि आजूबाजूला अनेकदा बदलेले गार पाणी आणि सतत डावाने हलवणे ई. तस्सेच काहीसे आपण सगळ्यांनीच लागेल तेव्हा करायला हवे, राग / लोभ / मत्सर ई. निघून जाण्याकरता चहू बाजूनी प्रयत्न सुरु ठेवायचेच, मग यश नक्की. गार पाण्याच्या डबक्यात बसावं, डोक्यावर बर्फ ठेवावा, हलकीच फुंकर घालावी आणि डावाने खीर हलवल्याप्रमाणे स्वतःच स्वतःला चाचपडून बघावं, बास, एवढं सोप्प आहे ते. प्रत्येक दिवस शांततेत जगण्यासारखे दुसरे पक्वान्न नाहीच.
गुरुवार, १० जून, २०२१
थंडावा सर्वत्र
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा