रविवार, १३ जून, २०२१

जलवर्धक परतफेड ... (भाग १२)

माझ्या बर होण्याच्या प्रक्रियेत आणि वेळेचा सदुपयोग म्हणून बरेच वाचन केले, विडिओ बघितले, चर्च्या केल्या (मनापासून आवडणारी गोष्ट) . सर्वानुमते भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे, माझ्या पाय दुखण्याचे एक कारण, असं डॉक्टर म्हणाले. पाण्याचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत, निसर्गाची केवढी मोट्ठी देणगी आहे पाणी म्हणजे, आणि एक जादू पेक्षा काही कमी नाही माझ्या साठी ते.

मी मिठाच्या गरम पाण्यात पाय घालून बसायचे आणि बसते, खूप खूप बर वाटतं. गरम पाण्याची पिशवी माझी रोजची सखीच झाली आहे आज काल तर. तिच्या शिवाय पर्यायच नाही मला. खरंच खूप बर वाटतं. मधल्या काळात तर मी दिवसातून अनेक वेळा गरम पाण्याची पिशवी वापरायचे. मागे लिहिल्या प्रमाणे नारळाचे पाणी / शहाळे हे हि रोजनिशीतली गोष्ट झाली आहे.

ह्या काळात माझं पाणी पिण्याचे प्रमाण जरा जास्तच वाढले कारण अनेक गोळ्या घेतांना बरेच पाणी प्यावे लागते मला.

रूपांतरित पाण्याचे सेवन, तांब्याच्या भांड्यातील, हि एक अजून आवर्जून होणारी गोष्ट सध्या.

"
बदाम पाण्यात भिजवून खा, नसांना चांगले असते", अस तज्ञांनी सांगितलं, हा पण एक रोजचा उपक्रम आहे सध्या. बघा ह्यात हि पाणी कित्ती महत्वाचे आहे. नाही का??

"
वॉटर थेरपी", "पाणी हेच जीवन" ह्यांचा तंतोतंत अर्थ कळला मला. अनन्य साधारण महत्वाचे आहे हे पाणी.

Dec 5, 2018, 9:55 PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...