माझ्या आईचे पाय
नेहेमी सुजलेले असायचे, खूप
उपाय झाले पण कधीच सूज कमी झाली नाही. अर्थात तो कधी तिला अडथळा जाणवला नाही, कामात किंवा नित्यनियमात. मी फारच लहान होते आणि त्यामुळे मला तिच्या पायांवर चालणे किंवा थोडी बहुत मदत करणे एवढेच करता येत होते. औषध गोळ्यांचा कंटाळा आला होता म्हणून ती रोज न चुकता तेल लावायची पायांना आणि सक्रिय ठेवायची सतत स्वतःला. पण तरीही तिचे पाय कधी कधी प्रचंड दुखायचे. तेव्हा ती फडकं घेऊन करकचून बांधायची पायांना आणि तिला खूप बरं वाटायचं.
ह्या post-flu काळात माझेही पाय
व्यायाम केल्यावर, चालल्यावर, उभं
राहिल्यावर प्रचंड दुखत होते. पण ज्या दिवशी पासून मी तांदळाची पोटली तयार केली, बांधली त्यानंतरचा अनुभव अवर्णनीय होता. मला तर अर्धा किलो तांदूळ नीट व्यायाम होई पर्यंत पायावर बसतील ह्या साठी अजूनच करकचुन बांधावं लागतं. माझ्या आईचा अनुभव आज उपयोगात आला. तिचा स्वानुभव आता माझाही झालायं.
रविवार, १३ जून, २०२१
अनुभवाची परतफेड ... (भाग १० )
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा