मी असंख्य वेळेला येल्लो नावाचा मराठी सिनेमा बघितला आहे आणि दर वेळी मी त्याच्या नव्याने प्रेमात पडते. दर वेळी ठरवते लिहाव म्हणून पण कसा काय कोणास ठाऊक आज तो योग आलाच. आज पुन्हा एकदा अचानक पणे विविध वाहिन्या बदलत असतांना येल्लो प्रक्षेपित होतांना दिसला आणि मग काय चिकटलेच सोफाला आणि पुन्हा प्रेमात पडण्यास संपूर्ण चित्रपट बघितला आणि मी पुन्हा एकदा निशभ झाले.
धन्य ते कलाकार, गीतकार, लेखक, दिग्दर्शक आणि संपूर्ण चमुच. 'माउली" हा शब्द उच्चारावा तर मामानेच, भारीच. आणि उपेंद्र लिमये नि काय काम केलाय, साष्टांग नमस्कार. गोष्ट सांगण्याचा सराव करतांनाच राक्षस, नाही तर येल्लो लाच सर्व श्रेय देणारा प्रशिक्षक, 'माझ्याकडे संयम नाही ' असा म्हणणारा आणि येल्लो सारखा पोहण्यास उद्युक्त करणारा दोस्त..... बापरे किती ते कांगोरे कलेचे, तेही एकाच कलाकाराने एकाच चित्रपट साकारणे म्हणजे आई शप्पथ बेभानाचं.....
मामा तर खरा अवलिया. अगदी गौरी बरोबर टप्पाटप्पाने शिकवणारा, शिकणारा, मस्तीखोर, जगावेगळा असाच. गौरीलाच नाही तर ह्या जगातलं सर्वांना हवाहवासा.
जरी
हा चित्रपट येऊन बरीच वर्ष झाली तरी मला मामाला आणि लिमयेंना भेटायची मनःपूर्वक इच्छा आहे. बघुयात केव्हा योग येतो ते आणि मी काही बोलू शकेल का ते, प्रेत्यक्ष भेट झाल्यास?
'टेन्शन लाच
टेन्शन देऊ
या रे...' हे त्याच चित्रपटातला एक गाणं. वाह वाह काय चपराक शब्द आहेत. पुन्हा एकदा मनापासून आभार असा अप्रतिम चित्रपट तय्यार केल्या बद्दल आणि मला निशब्द करून बरेच काही शिकवल्या बद्दल.
Jan
30, 2019, 4:21 PM on my FB Wall.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा