गुरुवार, १० जून, २०२१

गुळाचा दर्जा

मी नेहेमी कनकचा पावडर गूळ घेते भाजी आमटीत सोप जात घालायला म्हणून. ह्या वेळी जरा जास्तच गव्हाळी रंगाचा गूळ मिळाला आणि त्याचेच जेव्हा तिळगुळ लाडू केले तेव्हा पण खूप भगरा भगरा वाटलं, चव पण नव्हती खास. मला वाटलं एखाद वेळी माझाच प्रमाण चुकल असेल.


ह्या महिन्याच्या यादीत छोटी गुळाची ढेप मागवली आणि काल संध्याकाळी नवीन गूळ वापरून शेंगोळे केले, काय सांगू काय अप्रतिम चव होती त्याला. पाक करतांनाच मला जाणवला कि हा गूळ खूपच योग्य आणि अप्रतिम दर्जाचा आहे. चविष्ट चवदार लज्जतदार आणि ताजा.

नित्यनियमाप्रमाणे आज सकाळी जेव्हा गूळ तूप पोळी खात होते, तेव्हा संपवायचा म्हणून जुना गूळ घेतला. पहिल्या घासालाच पुन्हा एकदा जमीन-आसमांचा फरक जाणवला. सहज विचार केला तर असं जाणवल कि ह्या उत्कृत्ष्ट चवीसाठी सुपीक जमीन / मनापासून मशागत केलेली जमीन, पुरेसा पाणी पुरवठा, दर्जेदार खत, शेतकऱ्याचा स्वभाव आणि शेतीच्या कष्टाची जाण, दर्जेदार ऊस, चांगल्या प्रतीचं गुऱ्हाळ इत्यादी (आणि बरेच काही) सगळेच जबाबदार आहेत..

With due respect to all,
जुन्या काळच्या सासर-माहेर इतका फरक होता दोन गुळाच्या गुणवत्ते मध्ये.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...