गुरुवार, १० जून, २०२१

माझा, माझ्या स्वयंपाकाच्या मावशीनं मधला संवाद

माझा आणि माझ्या स्वयंपाकाच्या मावशीनं मधला संवाद काही दिवसांपूर्वीचा.

दोघीना हि बडबड करण्याची सवय आहे आणि त्यांचं निरीक्षण खूप भन्नाट आहे. असो. तर त्या दिवशीचा विषय होता नाश्ता डब्यात नेण्या विषयीचा. मावशी म्हणाल्या कि आता घरी गूळतूप पोळी खा आणि पराठा जो नाष्ट्या साठी केला आहे तो डब्बात घेऊन जा आणि ऑफिस मध्ये पोचल्यावर खा. मी त्यावर असा म्हटलं कि ऑफिस मध्ये न्यायच म्हणजे थोडे जास्त पराठे पाहिजेत. यदा कदाचित मी खातांना कोणी आलंच किंवा आम्ही एका खोलीत बसतो, थोडी थोडी चव द्यावी सर्वांना नाही का? बर नाही दिसत एकटं एकटं खायला.

त्यावर त्याचे त्वरित उत्तर होतं कि आम्ही जेव्हा आई बरोबर शेतात जात होतो बरीच वर्ष तेव्हा आम्ही एक गोष्ट बघितली. प्रत्येक जण शेतात शिदोरी घेऊन येतो दररोज चुकता. त्या शिदोरीत भाकरी, भाजी / चुन, ठेचा आणि कांदा असायचा. बहुतेक रोजच सर्वजणच एखाद-दोन भाकरी / संपूर्ण शिदोरीच जास्तच आणायचे, त्याचे कारण म्हणजे जर चुकून माकून कोणी डब्बा आणला नाही, कोणत्या मुलींनी / बाईंनी रागात घर लवकर सोडले शेतात येण्यास, तर पंचाईत व्हायला नको आणि थोडासा पोटाला आधार सर्वांच्याच म्हणून.

किती छान कल्पना आहे नाही. मला तर फारच आवडली. लयी भारी.

म्हणजे सर्वच थरात आहे तर दुसर्यांचा विचार करणं आणि घरा बाहेर पडतांना थोडस जास्तच किंवा कोरडा खाऊ जवळ ठेवणं. वा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...