माझे बाबा नेहेमीच मला
सांगायचे कि जे सहज उपलब्ध असत त्यातनच उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करायचा, हातात नाही त्याची वाट पाहत बसायची नाही किंबहुना त्याबद्दल तक्रार तर नाहीच नाही. हेच वाक्य मी माझ्या घरच्या आणि दारच्या (विद्यार्थ्यांना) हि सतत सांगत असते. आज त्याची छोटीशी प्रचिती आली म्हणून हा लिहिण्याचा उहापोह.
माझ्या पायांमुळे ह्या वर्षी कुठेही सुट्टीत गावाला जाणं तर अशक्यच आहे, तेव्हा घरीच काय काय वेगळं करू शकतो हे ठरवलं त्यात माझ्या मराठीने पहिला नंबर लावला, रोजच वर्तमान पत्र वाचन आणि त्यावर चर्चा घरच्या मुलांशी आणि लिखाणही.
मी रोजच वर्तमानपत्र घेत नाही कारण वाचायला वेळ नसतोच, फक्त शनिवार रविवार मात्र आवर्जून घेते, चालते आणि वाचते देखील. त्यामुळे माझ्या पेपर विक्रेत्याला सवय नाही मराठी पेपर द्यायची. आज आवर्जून माझ्या लेकीने त्याला थांबवले आणि मराठी पेपर सकाळ देण्याची विनंती केली. तो म्हणाला सकाळ नाही आहे लोकमत देतो आणि दिला देखील. माझ्या लेकीला जरा वाईटच वाटलं कि सकाळ वाचायला नाही मिळणार. पण त्यावर माझं उत्तर तयारच होत. लोकमतचा कागद अगदी वेगळा असतो, त्यामुळे त्याचा तो हातात धरून वाचण्याचा अनुभव वेगळाच. त्यात लिपीचाही समजण्या इतका फरक आहेच. एकंदरीत काय पण बदल फार चांगला आहे. अर्थातच भाषा हि खूप वेगळी आहे लोकमतची, कारण पत्रकार वेगळे त्यांची सिद्धांत त्याहून वेगळे त्यामुळे आज माझी वेगळीच पर्वणी आहे. अहाहा, सुट्टी असावी तर अशी, घरच्या घरी लई भारी ....
त्यात लोकमत हि माझ्या माहेरचं वर्तमानपत्र आहे त्यामुळेही तर "Cheery on
Cake"....
शनिवार, ५ जून, २०२१
मराठी वर्तमानपत्र...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा