शनिवार, ५ जून, २०२१

आठवणीतले कप...

माझे बाबा बरेचदा फिरतीवर / दौऱ्यावर असायचे, विविध गावात, शहरात, राज्यात . त्यांना कामानिमित्य जावं लागायचं. प्रत्येक वेळी ते काही ना काही तरी आणायचेच मला, आईला, घरासाठी. एकदा असेच कलकत्त्याला गेले होते. माझ्या आईला कॉटन साड्यांचं फारच आकर्षण. त्यामुळे ते थेट - साड्या घेऊन आले, अप्रतिम निवड होती त्यांची, रंगसंगती कशी कळायची कोणास ठाऊक. त्याच वेळी खरेदीला गेले असतांना त्यांना एक वेगळ्याच धाटणीचे कॉफी मग दिसले, घेतले विकत ताबडतोब. ते मग इतके देखणे होते कि बास बघतच बसावं त्यांच्या कडे, वापरू नये असच वाटायचं. तर त्या मग ची खासियत अशी होती कि गरम पेय पितांना मग पकडायला सोप्पं जावं म्हणून एक वेगळाच गोलाकार आकार दिला होता आणि त्यामुळे मगाचा कान मोठा झाला होता. अप्रूप वाटायच तेव्हा तो नावीन्य पूर्ण आकार बघून.

हः, तर हे सगळं रामायण लिहिण्याचं कारण अस कि एवढ्यातच मला त्याच धाटणीचे पण छोट्या आकाराचे कप मिळाले आणि ते मी विकतही घेतले ताबडतोब. त्यांना संगणकावर बघता क्षणीच मी प्रेमातच पडले आणि सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि हा छोटेखानी लेख हि लिहिला गेला. माझ्या वडिलांच्या निरीक्षणाचं फारच कौतुक वाटलं, त्याकाळी कधीही पाहिलेले किंबहुना नाविन्यपूर्ण ठेवणीतले ते मग माझ्या घरी अजूनही आहेत. आणि कदाचित एवढ्या साड्या आणण्याचं कारण हि आता मला समजलं / उमगलं. ते मग मोठ्या आकाराचे होते, पुसटशी आठवण आहे कि प्रत्येक साडीत व्यवस्थित गुंडाळून काळजीपूर्वक आणले होते ते मग बाबांनी. अहाहा.

मी नेहेमीच लिहिते कि माझे बाबा म्हणजे संपूर्ण मोठं महाविद्यालाच / university होते, खजिना होता तो, विविधतेने नटलेला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...