आमच्या नागपुरात तसे
सगळेच ऋतू
अती
प्रमाणात होते, किंबहुना आहेत. उन्हाळ्याचं तर विचारूच नका. पण त्यातही डेसर्ट कुलर, घरी हाताने तयार करायचे आईस्क्रीम, अंगणात झोपणे, समोर मागे अंगणात सडा टाकणे, पत्ते कुटणे, आणि बरेच उद्योग करून उन्हाळ्याचाही आनंद उपभोगणारे आम्ही नागपूरकर. ह्या उन्हाळ्यात बहुतेक रोजच दोनदा तरी आंघोळ करावी लागायचीच. बहुतेक थंड पाण्याने पण नेहेमीच आईच एक सांगणं असायचं कि एक बदली भरून उन्हात ठेवायची, पाणी नैसर्गिक रित्या गरम / कोमट होते आणि मग त्या पाण्यानी आंघोळ करायची. म्हणजे कातडीचे किंवा घामामुळे होणारे रोग होत नाहीत. मलाही मजा वाटायची, एक छोटस कामच होत ते, बादली भरून ठेवायची, शंभरदा नको असतानां बोट घालून बघायचं किती पाणी गरम झालं ते, आणि एखादा वाळत घातलेला अर्धवट ओला पापड लंपास करायचं, काही विचारू नका.
तर हे सगळं आठवायचं कारण म्हणजे काल मी खूप दिवसांनी आळसात सुट्टीचा दिवस घालवला. खूप भरपूर झोप काढली आणि खूप उशिरा आंघोळ केली. वरच्या टाकीतील पाणी असलं तापलं होत कि बास. नैसर्गिक रित्या तापलेल्या पाण्याने आंघोळ केली आणि सगळ्या गोड स्मृती जाग्या झाल्या. अर्थात टाकीतील पाण्यात सूर्यकिरण थेट पडत नाहीत, पण "हेही नसे थोडके"...
शनिवार, ५ जून, २०२१
नागपूर चा खास उन्हाळा ...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा