आज मी शाहिद माल्या ह्या चे गाणे ऐकले MTV Unplugged वाहिनी वर. वा वा. अप्रतिम च्या पुढचा काही शब्द असेल तर तो इथे लागू पडेल.
तर हे सगळं बोलत असतांना मी आणि माझी मुलगी "पहाडी आवाजच" का म्हणतात? ह्या वर जरा उहापोह केलं आणि आमची थोडक्यात अशी चर्चा झाली.
पहाडी आवाज असलेली लोक
साधारणतः मोठ्या अशा
डोंगराळ प्रदेशातील असतात. त्यामुळे त्यांचा आवाजच खूप
मोकळा असतो. ह्याच कारण म्हणजे त्यांना मोकळा रियाज करता येतो, बाहेर, निसर्गाच्या सानिध्यात, सर्वदूर डोंगर असल्यामुळे आवाज घुमतो आणि
स्वतःलाच ऐकता येतो, सुधारणा करता येते. आवाज चोरून गायची गरजच नाही, चार
भिंतींच्या आत. डोंगराळ भागात रोजच खाणंच खूप
नैसर्गिक,व्यायाम, हवा
मोकळी आणि
साधी राहणी. माझा असा
अंदाज आहे
कि ह्या सर्वा मुळे पहाडी आवाज तय्यार होतो आणि टिकतोही.
भन्नाटच. ऐका
हे गाणं. तुम्हाला हि आवडेल कदाचित.
https://www.youtube.com/watch?v=Gu2tNVE1jUM
रविवार, ६ जून, २०२१
पहाडी आवाज...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा