रविवार, १३ जून, २०२१

परतफेड ... (भाग ७)

ह्या प्रदीर्घ सुट्टीत भरपूर वेळ असल्यामुळे आणि माझ्या फेसबुक च्या प्रेमामुळे मी अनेक विडिओ क्लिप्स बघितल्या, भरपूर वाचन केलं त्यात सुविचार होते, गोष्टी होत्या, गाणी होती, अनुभव होते आणि बरंच काही. त्यात एक विडिओ बघण्यात आला. एक अतिशय तरुण आणि उत्साहानी सळसळणारं व्यक्तिमत्व वाटलं मला. अगदी छोटा होता विडिओ आणि त्यात असं सांगितलं होता कि दररोज, सर्वांनी, जमेल तसं फक्त मिनिट
"I am physically strong and mentally calmm.."
असं म्हणायचं आणि फरक अनुभवायचा. बदल घडणार हे निश्चित. मलाहि प्रेरणा मिळाली. सुरवाती सुरवातीला, "I am physically strong and mentally calmm.. " म्हणण्या ऐवजी सतत "I am physically strong and mentally weak... " म्हणत गेले. थोड्याश्या सरावा नंतर, नकळत बदल जाणवला तेव्हा कळलं कि मी सांगितलं तस्स म्हणत होते.

मी आता हे जमेल तसं चालू ठेवणार आहे, कारण हा बदल खूप छान आहे आणि हीच माझी परतफेड होय. ह्याच वेळी तो विडिओ मी बघणं (किंबहुना बघायला मिळणं) हे एका चमत्कारा सारखंच होतं मला.

असं म्हणतात , कि "वेळेच्या आधी..." कधीच काही होत नाही.

Nov 25, 2018, 12:44 PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...