रविवार, १३ जून, २०२१

परतफेड ... (भाग ५)

त्या तापाच्या काळात, त्यानंतर मी कार्यालयत जायला लागले तेव्हा आणि आत्ता सुद्धा मला अगदी डोहाळेच लागले होते आणि आहेत. काहीही, म्हणजे मी कधीही खात नाही असेही पदार्थ खायची तीव्र इच्छा होत होती. बापरे. मी कसं आणि काय काय केलय ते खाण्यासाठी माझ मलाच माहीत. Online मागवलंय, मुलांना सांगितलंय, आणि अनेक असे प्रकार केलेत.

तेव्हा माझ्या सर्व मावशींनी, घरच्यांनी त्यांना वेळ मिळेल तेव्हा, जमेल तसं ते ते पदार्थ खाऊ घातलेत. आमच्या कार्यालयातल्या प्राची मॅडम नी तर बरेच वेळेला खास डब्बा आणलाय, अनेकदा. सकाळी खास पदार्थ करणे म्हणजे विशेषच, खरंच. धन्य ती माउली.

हे सर्व करण्यात त्यांचं प्रेम होतच पण मी लवकर बरी व्हावी हि भावना हि होतीच. माझी खास मैत्रीण दिपाली हि पण इतक्या दूर, काम काढून आली, खूप खूप वेळ दिला मला, बोलली, वेगवेगळ्या विषयावर आणि अनेकविध पौस्टिक असे लाडू देऊन गेली. ते खाऊन जितकी ऊर्जा आली नसेल तितकी तिच्या येण्याने मिळाली.

माझे एक स्नेही कोलकत्ता ला गेले होते, त्यांनी माझ्या साठी खास मिठाई तर आणलीच पण एक भेटवस्तू हि आणली. माझ्या मते त्यांनी ती भेटवस्तू आणण, हि माझ्या तीन पिल्लांची कल्पना होती, केवळ मला पट्टकिनी बरं वाटावा म्हणून. मिलीभगत...

ह्या सर्व प्रेमाची परतफेड कधीच होणार नाही, अशक्यच.

Nov 20, 2018, 7:57 AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...