रविवार, १३ जून, २०२१

परतफेड ... माझा दृष्टीकोन (भाग ६)

असं म्हणतात कि तुमच्या ओळखीच्या पैकी कोणी गोड बातमी देणार असेल, तर तिला जे खावंसं  वाटतंय ते नक्की खाऊ घालावं, जितक्या वेळा जमेल तसे. का? हे मला माहित नाही आणि कधी विचारलं हि नाही, विचार हि केला नाही, कृतीला महत्व दिलं. मला हि अनॆक लोकांनी वैविध्य पदार्थ खाऊ घातले होते, तेव्हा. कधी मला खावेसे वाटले म्हणून, तर कधी त्यांना वाटलं हे मी खावं म्हणून. बाळंतपणा नंतर, मुलांना मोठा करण्यात बरीच वर्ष गेली, आता त्या सर्व मंडळींना शोधून परतफेड करणे अशक्य आणि अवघडच. किंवा त्यांनी परफेडीच्या दृष्टीनी ते कधीच केलेही नव्हतं.

परतफेड हि देवाण घेवाण आहे, त्याचं वक्तीशी नाही. करत राहिल पाहिजे आपल्या सर्वांसाठी, कुटुंबियांसाठी, मित्र मैत्रिणी साठी, आजूबाजूच्या साठी, समाजासाठी, मूक प्राण्यांसाठी, झाडांसाठी, आणि आपल्या समाधानासाठी. परतफेड हा हिशोब किंवा व्यवहार नाही. मला मिळालेली मोलाची मदत ती कुठलाही स्वरूपाची का असेना, महत्वाचीच होती, आणि म्हणूनच मिळाली. तर अशीच (निस्वार्थ) मदत ऐपतीनुसार सातत्याने करत राहणं हे आवश्यक आहे, प्रत्येकाला.

निसर्गाने अथवा देवाने प्रत्येकाला बुद्धी, ताकद, शक्ती, ऐपत . दिली आहे, तिचा यथार्थ वापर करणे, निस्वार्थ आणि सातत्याने मदत करत राहणे एवढेच आपल्या हातात आहे. शेवटी देणारा तोच, आपण फक्त नाममात्र.

आता ह्या आजारपणात पुन्हा एकदा सर्वानी केलेल्या मदती मुळे एक जाणवलं, कि अजून बरीच वर्ष आणि भरपूर कार्य करायचे आहे, तेव्हा पट्टकिनी बरं होणं आवश्यक आहे. हि प्रेरणा मिळणं "हे हि नसे थोडके..."

Nov 25, 2018, 12:19 PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...