रविवार, १३ जून, २०२१

परतफेड ... (भाग ४)

शाळेत असतांना काय, किंवा घरी मोठं होतांना काय, सगळ्यांनी एकच मोठा धडा शिकवला होता, तो म्हणजे स्वावलंबन चा. आणि तेही शिस्तीचं स्वावलंबन. मला खरंच सार्थ अभिमान आहे कि मी बरीच वर्ष शिस्तीत स्वावलंबी राहण्याचा प्रयन्त केला. तो यशस्वी देखील झाला. पण आता ह्या दोन महिन्यात मी परावलंबित्व अनुभवते आहे. एखादी गोष्ट मूळ स्वभावात नसेल तर कित्ती अवघड जाते, देवा. दुसऱ्यांना सांगण्यातच इतकी ऊर्जा, वेळ, शक्ती वाया जाते, मनस्ताप होतो तो वेगळाच. पण पर्याय नाही. ह्यतनही किती शिकण्या सारख आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे शांत राहणं, अपराधीपणाची भावना येऊ ना देणं, तरीही आनंदी राहणं इत्यादी...

स्वयंप्रेरणा देत राहणं म्हणजे हि एक प्रकारचं स्वावलंबनच, नाही का?

खुपच शिकायला मिळालं आणि मिळतंय.

एक पूर्णविराम लागला होता, त्यानंतर अनेक स्वल्पविराम अनुभवले, त्या छोट्याश्या पूर्णविरामाचाही इतकं महत्व असत हे ह्या काळात कळलं. लहानपणी फक्त व्याकरणात गुरुजींनी शिकवलं होता आणि मी डोळे बंद करून फक्त वापरात होते, हि सगळी चिन्हे. एवढंच.

त्या पूर्णविराम, स्वल्पविराम ना धन्यवाद. आणि त्यांच्याकडे मी जरा व्यवस्तिथ लक्ष देईन, ह्यापुढे, एक छोटीशी परतफेड म्हणून.

Nov 20, 2018, 7:36 AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...