इतक्यातच लेकीच्या फर्माईशीला मान देऊन मी पास्ता केला घरी. अर्थात त्यात माझे अनेक फायदे होते, एक म्हणजे त्या दिवशी काय करायचं हा प्रश्न तिने सहज सोडवला होता माझा, आणि दुसरं म्हणजे वेगळं चमचमीत खायला मिळालं आम्हा सगळ्यांनाच, स्वयंपाकात बदल झाला त्यामुळे उत्साह शिगेला पोचला माझा, आणि बरीच कारण आहेत. "ब्लिंक ऑफ an आय" आणि सगळा पास्ता "वन डिश मिल" फस्त झाला देखील. जेवणं झाल्यावर आवरताना घाई घाईत माझ्या हातून बहुतेक उरलेल्या पास्त्याचा पुडा थोडा उघडाच राहिला आणि आमच्या मावशी काही तरी काढायला गेल्या आणि थोडासा धक्का लागला, छोटे छोटे कच्चे पास्ता स्वयंपाक घरात जमिनीवर पडले. आमच्या मावशी ताबडतोब म्हणतात कश्या "मी स्वच्छ धुवून ठेवते त्यांना (म्हणजे त्या सांडलेल्या कच्या पास्त्यांना ), जमिनीवर पडलेत ना, पोटात खायची वस्तू आहे ती" आणि लागल्या कामाला, बरं झालं तेवढ्यात मला जाग आली खाड्कन. पहिल्यांदा स्वयंपाक घर गाठलं, म्हटलं किती सांडलाय पास्ता ते बघावं आधी. देवा, काय पडतात ना स्वप्न मला. पास्ता करून, खाऊन झोपले ह्याचा परिणाम अजून काय. मज्जा आली. कल्पना पण करवत नाही मला, हे असं कसं मावशी विचार करू शकतात. काहीही, असो, पण नंतर मी पोट धरून खळखळून हसले, आणि बहुतेक प्रत्येक वेळी पास्ता केला कि आता मला हासू आवरणार नाही हे नक्की.
गुरुवार, १० जून, २०२१
स्वच्छ साफ धुऊन
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा