शनिवार, ५ जून, २०२१

कप आणि उशी

अगदी बरोबर वाचलंत मंडळी हो हो "कप आणि बशी" नाही हो, "कप आणि उशीच". माझा कालचा दिवस अतिशयच वेगळा होता हे नक्की अनेकविध कारणांनी. ती कारण मी नंतर देणार आहेच पण एक महत्वाच कारण म्हणजे मला "कप आणि उशी" मिळाली माझ्या तीन मुलांकडून मातृदिनाच्या भेट म्हंणून. अतिशय छोटा पण गोड संदेश लिहिलेला दोन्ही गोष्टींवर, त्यावर सुंदर चित्र एकसारखं आणि अतिशय साजरं-वेगळं एकत्र करून दिलेली भेट ती, नेहिमी लक्षात राहणारी. मग मला जाणवलं कि ज्यांनी कोणी ही भेट वस्तू तयार केली असेल त्याने काय विचार केला असेल. तर तो असा असणार कि कॉफी पीतपीत उशीला आरामात टेकून बसायचे आणि आनंद घ्यायचा ह्या जगावेगळा. मला कोणीही काहीही छोटीशी जरी भेट दिली तरी ती माझ्या साठी डोंगराएवढी मोठी आणि अप्रतिम असतेच. हे जगावेगळं कॉम्बो बघून पटकन लिहावंसं वाटलं एवढंच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...