बाहुबली नावाच्या महाकाय चित्रपटाचा नायक जसा
एका
वेगळ्याच पठडीतला आहे
आणि
त्याच काम
हि तितकंच कलात्मक, आश्चर्यकारक आहे, तसेच एक व्यक्तिमत्व मला आढळले किंबहुना भेट झाली.
"World is one family" "वसुधैव कुटुंबकम" म्हणजे आमच्या सिंबायोसिस मध्ये एक शैक्षणिक प्रशिक्षण आयोजित केलं होत, तब्बल दहा दिवसांचे. त्यात एक दिवस एका अगदी वेगळ्याच विषयावर बोलायला, शिकायला एक शिक्षक आले. ८ तास सलग अगदी सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने त्यांनी "Thick Data" वापरून गुणात्मक संशोधन कसे करायचे हे सांगितले. वेगळा विषय आणि त्याहून अगाध ज्ञान असलेला शिक्षक जो कि बाहुबली नायका सारखा वागणारा / दिसणारा म्हणजे "सोन्याहून पिवळे" नाही का? खूप खूप शिकण्यासारखं होत त्यांच्या कडून, एक वेगळेच कवाड उघडले गेले संशोधन मार्गाचे. त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने शिकवल्यामुळे अजूनच लक्षात राहिले आणि येणाऱ्या काळात वापरावेसे वाटले. मी आधीपासूनच प्रमाणित संशोधन केले आहे जेथे असंख्य प्रमाणात डेटा / संख्या उपलब्ध असतात आणि त्यावर वेगवेगळी समीकरणे लावून एक किंवा अनेक निष्कर्ष काढायचे असतात. पण गुणात्मक असा काही विषय हि असतो हे माहीतच नव्हते. असो आता कळले. लवकरच मी ते वापरण्याचा प्रयन्त करीन.
आमच्या सिंबायोसिस ने असेच अनेक उपक्रम आयोजित करत राहावे, म्हणजे वेगवेगळे विषय शिकायला मिळतील आणि विविध नवीन संदर्भ उमजतील संशोधन विषयातले.
Wrote on FB on May 13th 2019.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा