रविवार, ६ जून, २०२१

मोकळा श्वास...


काल संध्याकाळी कित्येक वर्षानंतर मी बगिच्यात गेले, देवा, काय वाटलं म्हणून सांगते. मुलं लहान होती तेव्हा सगळे पुण्यातले बगीचे पिंजून काढले होते मी, पण आता ते होणे नाही. त्यामुळे का कोणास ठाऊक पण वेगळं मोकळ वाटलं.

किती गर्दी होती त्या बगिच्यात, भरपूरच. सगळ्या वयाचे लोक आले होते, सर्व प्रकारचे उद्योग, खेळ, व्यायाम, खाणं, आणि बरच काही सुरु होतं त्या बागेत. सगळेच जण आनंद, वातावरण, मोकळी हवा, हिरवळ, स्वछ बगीचा चा आस्वाद घेत होते पुरेपूर.

मुलं मोठी झाली म्हणून काय झालं?, जायला हवं कधी कधी बगिचात.

आम्ही आमचा कार्यक्रम उरकून बाहेर आलो तर हे भली मोठी रंग लागली होती तिकीट खिडकी जवळ. मस्त सजलेला उंट होता चक्कर मारण्यास सज्ज असा, उसाचा रस वाला होता, गोळा वाला पण होता, खेळण्यांची दुकाने होती, रंगवायची पुस्तके होती, हवा भरून ठेवलेली घसरगुंडी होती, खूपच छान जपलेला / सांभाळलेला असा तो बगीचा होता.

सिमेंट च्या आणि कृत्रिम हवेच्या भाऊगर्दीत कालचा घेतलेला मोकळा श्वास हवाहवासा होता.

March 18th 2019, wrote this Anukatha on FB.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...