आज एक विक्रेता काही वस्तू घेऊन घरी आला. त्याला नेहेमी प्रमाणे पत्ता सापडत नव्हता. मी कचेरीत होते आणि त्याला मदत करत होते माझं घर शोधण्याला, तो जवळपास आलाच होता. सरते शेवटी तो घरासमोर पोचला आणि पाटी वाचली. तर म्हणतो कसा, "सापडलं मला घर हं ..." हेच घर आहे ना तुमचं "प्रीती मौल्य" लिहिलंय तेच ना.
आई शपथ, काय छान वाटलंय म्हणून सांगू.
नवीन उच्चार पण मौल्यवान. लयी भारी, आवडलं मला. मस्त गेला माझा दिवस आज.
माझं नाव
आणि
आडनाव हे इतक्या अनेक प्रकारे लिहिता आणि उच्चरता येत ना, कि बास. पण आज हा उच्चार फारच वेगळा होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा