तब्बल १६ - १७ वर्षांपूर्वीची कथा आहे हि. अगदी लहान होती माझी मुलं, पट्टकिन चालायला आणि थोडंथोडं बोलायला शिकली होती. मी, हे, माझी आई, मावशी ई. चहा घेत असू. आम्ही चहाचा कप हातात घेतला कि त्यांना इतकी उत्सुकता वाटायची कि काय घेतात हि मंडळी हातात?, काय असेल ह्यात?, का लपून पितात? ई.
हि दोघ जवळ एकदम येऊ नये, त्यांना पोळू नये म्हणून मीच त्यांना शिकवलं होत "चहा हा (फार गरम)", मग उगाचच चटका बसल्यासारखं करायचं, ई.
काही महिन्यांनी त्यांना बिस्कीट बुडवून द्यायला सुरवात केली त्या "हा" चहा मधे, मग अगदी थोडी चव पण दिली, अशी छोटी छोटी प्रगती सुरु होती.
आम्ही तेव्हा भाड्याच्या घरात राहत होतो आणि चारच प्लास्टिक च्या खुर्च्या होत्या. त्यामुळे चहाचा कप हातात असतांना एकतर खुर्चीवर बसायचं किंवा उभं राहून चहा प्यायचा, असा अलिखित नियम होता. मी चहाचा कप हातात घेतला रे घेतला कि कुठून दोघांना वास यायचा, पट्टकिनी पळत यायचे आणि त्यांच्या छोट्या हातानी दोघे एकदम जोरजोरात माझ्या मांडीवर, पायावर मारून सांगायचे, "मम्मा$$$$ चहा हा". देवा. खूप मार खाल्ला आहे मी. बरं म्हटलं तरी जोवर चहा संपायचा नाही तो वर ह्यांचं चालूच आणि बाकी कोणाची काळजी नव्हती हो त्यांना,माझ्याच मागे. "मेरी बिल्ली मुझीको म्याऊ" असं झालं होत ते. केवढी ती आईची काळजी किती आधीपासून बघा ना. काय दिवस होते ते, अजूनही खूप आठवण येते आणि डोळ्यासमोर ती गोंडस पिल्लं उभी राहतात ताबडतोब.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा