व्यायामाची पुढची पायरी म्हणून माझ्या डॉक्टरनी मला पायाला वजन बांधायला सांगितले. मी जवळपास तेच तेच व्यायामाचे प्रकार दोन आठवडे करत होते. त्यामुळे नवीन करण्याची उत्सुकता होतीच. आता एक गहन प्रस्न होता तो कि हि वजने कुठे मिळतील. डॉक्टर म्हणाल्या कि माझ्या चिकित्सालयात आहेत, रोज या. ते थोडं अवघड होता मला, घरीच कैद असल्यामुळे. बरं, अजून काही पर्याय? तर म्हणाल्या कि कुठल्याही स्पोर्ट्स दुकानात मिळतील. ते ही सध्या अशक्यच होता, जाणं आणण वगैरे. बरं मग अजून उपाय म्हणजे online मागवणे किंवा घरी पोटली तयार करणे अर्धा किलोची, तांदूळ किंवा गहू घालून. ताबडतोब माझ्यातली धडपडी कलाकार जागी झाली आणि मी तांदळाची पोटली तयार केली, व्यायाम चालू केला देखील. ह्या महिन्यात मी आंबेमोहोर तांदूळ आणला आहे आणि त्याची पोटली बांधून व्यायाम करतांना अप्रतिम सुगंध येतो. ती पोटली पायांना गच्च बांधल्या मुळे ही फायदाच झाला. पहिल्या दिवशी जरा पाय दुखले पण नंतर हा बदल खूपच आवडला, आणि जाणवला सुद्धा.
मी मध्ये एकदा सुजोग उपचार घेतले होते थोडे दिवस आणि त्यात हरभरा किंवा मेथी दाणे वापरतात. का? कारण त्या बिया / दाण्यात जीव असतो, ऊर्जा असते आणि तीच ऊर्जा + ठराविक दाब, ह्यामुळे रोग लवकर बरं करते.
आताही तसेच वाटले मला, तांदुळाच्याल्या प्रत्येक कणात जीव
आणि
ऊर्जा असते तीची मदत
मला
बहुमूल्य ठरली, कारण पोटल्या जवळपास चाळीस मिनिटे बांधलेल्या असतात.
दररोज त्या पोटल्या बांधून नचुकता व्यायाम करणे, आनंद घेत
आणि बरं होण्या कडे वाटचाल करणे हीच परतफेड होय. बाजारात सहज उपलब्ध असलेल्या पट्ट्यांना ह्या घरी तयार केलेल्या आणि अनुभवलेल्या पोटल्याची सर नाहीच.
रविवार, १३ जून, २०२१
सुगंधी परतफेड ... (भाग ८)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा