माझ्या बाबांकडे एक मध्ये दांडा असलेली सायकल होती. मी त्याच सायकल वर शिकले चालवायला, वाकडा / आतून पाय घालून वगैरे. अफलातून मज्जा होती ती.
तर अशी सायकल वापरून शिकण्या आधी, मी सीट वर बसून फक्त पायडल मारायचे, गम्मत म्हणून, कारण ती मधल्या स्टॅन्ड वर लावलेली असायची. सरळ उलट पायडल फिरवल्या मुळे बरेचदा चेन पडायची, मग ती लावायची, उगाचच घंटी वाजवायची, ब्रेक दाबायचे. काही विचारू नका.
आता
डॉक्टर च्या चिकित्सालयात छोटीशी व्यायामाची सायकल आहे, आणि
ती आता माझ्या साठी खूपच उपयोगी आहे, पण रोज तिथे जाणं अवघड आहे. तेव्हापासून रोज क्षणोक्षणी मला माझ्या बाबाची सायकल आठवते आहे. ती असती आज तर पुन्हा एकदा, इतक्या वर्षांनी फक्त पायडल मारायला मिळाले असते आणि व्यायाम हि झाला असता. पण ते आता शक्य नाही.
काही का असेना मला अत्यंत रमणीय अश्या आठविणीत घेऊन जातो हा प्रसंग, रोज डोळ्या समोर उभं राहत ते लहानपण.
अश्या गोड
असंख्य आठवणींची परफेड म्हणजे त्यांना आठवत राहायचं, हसायचं, लिहायचं आणि
नवीन प्रेरणेने / उमेदीने जगायचं.
रविवार, १३ जून, २०२१
आठवणींची परतफेड ... (भाग ९)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा