रविवार, १३ जून, २०२१

अजिबोगरीब प्रश्न

 माझ्या मुलांच्या शाळेत काही फ्रान्स देशातून मुलं आली आहेत (स्टुडन्ट एक्सचंगे प्रोग्रॅम) म्हणून. शाळा त्यांना पुणं दाखवते आहे, माहिती देत आहे, काही प्रमाणात ते खरीदारी ही करत आहेत वगैरे वगैरे. तर त्यातल्याच एका मुलांनी माझ्या मुलीला म्हणे प्रश्न विचारला. कि तुझे बाबा (बघा हे) हत्ती वरून ऑफिस ला जातात का? आणि बोलता बोलता जेव्हा ती हे सर्व वर्णन करून मला सांगत होती, तेव्हा मी असं उत्तर दिले कि "हो, अजूनही बाबा हत्ती सांभाळतात आणि ऑफिसला घेऊन हि जातात". असं म्हणतात ना कि स्वतः ची कार असणं म्हणजे पांढरा हत्ती संभाळण्या सारखंच आहे, नाही का? मस्त हशा पिकला घरात. मज्जा आली. वाढत्या वयातल्या मुलांबरोबर मोठा होणं हि काही अजिबच गोष्ट आहे.

आई बद्दल नाही विचारला ह्याचं महद-आश्चर्य वाटतंय मला. प्रगत देशातून येऊनही आणि पुण्यात भटकंती करूनही हा प्रश्न पडला म्हणजे .....????

Nov 28, 2018, 2:36 PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...