बुधवार, ९ जून, २०२१

बासुंदी चहा

मी पूर्ण बरी झाले कि काय काय करणार ह्याची सध्या यादी तयार करते आहे आणि त्यात महत्वाचे असे किंबहुना ठळक अशी गोष्ट म्हणजे मी "बासुंदी चहा" प्यायला जाणार आहे. कित्येक दिवस काय, महिने म्हणायला हरकत नाही, पण फक्त जाता-येता रस्त्यात फलक दिसतो तेवढाच, कधी चव घेतली नाही. मला जरा कुतूहल आहे काय असेल हा चहा, खूप गोड असेल का? विचित्र लागेल का आवडेल? असे अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे लवकरच मिळतील अशी अपेक्षा.

इतके प्रश्न का पडले ह्याची ही बरीच करणे आहेत. माझ्या कडे बासुंदी हा पदार्थ अत्यंत आवडीचा असा आहे आणि तो थंडगार असण्यास प्राध्यान आहे, म्हणजे त्याची मज्जा काही औरच. माझी लेक म्हणते -इन-, बासुंदी ची चव अगदी कुल्फी सारखी आहे, उरली तर ती चक्क गोठवून खाते. तर अशी गारेगार बासुंदी. आणि त्या विपरीत चहा, अगदी उकळता लागतो. मग नक्की काय मामला आहे हे बघावच लागेल, नाही का??


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...