बुधवार, ९ जून, २०२१

अनोखा हार

मागल्या सोमवारी अचानक आमचं ऑफिस सुरु झालं आणि आता आम्हाला आलटूनपालटून एक दिवसा आड जायचंय ऑफिस ला. मंगळवारी घरून काम सुरु होत, बऱ्याच मिटिंग, परीक्षेची कामे होती, दिवस अख्खा त्यातच जाणार होता आणि बदल म्हणून माझी लेक म्हणाली काही आणायचं आहे का मी जाते, म्हटलं "सोन्याहून पिवळं". तिला सांगितलं काय काय हवं आहे कारण पोरांना स्पेसिफिक च डिनर हवं होत त्यादिवशी म्हणून स्वारी उत्साहानी निघाली होती इन्ग्रेडिएंट्स आणायला. म्हटलं मग हार घेऊन ये, देव अगदी देखणे दिसतात देवघरात हार घातल्यावर, अर्थात माझ्या डोळ्यांना हो. असो.

माझी मिटिंग चालू होती त्यामुळे ती कधी जाऊन काय घेऊन आली मला माहित नाही पण हार मात्र तिने दाखवले खुणेनी. माझी मिटिंग संपली रे संपली कि मग मी देवघर स्वच्छ करून हार घालायला घेतले. तर काय आश्चर्य एक हार कमी होता. मग म्हटलं असू दे, हार वाला विसरला असेल किंवा हि विसरली असेल आणायला. जाऊ दे काय करायचं विचारून. पण तो एक फोटो हाराशिवाय राहणार हे देखील मला पटत नव्हतं. म्हटलं काय करावं. बघितलं तर भरपूर फुल आणली होती लेकीने. बास मग काय दोरा काढला आणि गाठ बांधून अप्रतिम हार कधी तय्यार झाला कळले देखील नाही. काय समाधान वाटलं म्हणून सांगते. लेक जेवणाच्या वेळी खाली आली आणि तिने हार घातलेले बघितले आणि म्हणते कशी अरे वा छान, पण एक हार कमी होता. पण मग कुठून आला, घरी केला? कसा केला?. तिला पण मज्जा आली. गोळाबेरीज = सगळ्या फोटोना हार मिळाले, मला अनेक वर्षानंतर स्व हाताने हार करता आला, पूजा पूर्ण झाली आणि एक छोटेखानी न कळत चांगला धडा मिळाला मुलांना कि शांतपणे सगळं कसं हाताळायचं. "असा कसा तू एक हार कमी आणला? विसरलासी का? हे ते ...." हे सगळं विचारायला आणि बोलायला मला इच्छा, वेळ आणि इंटरेस्ट तर अजिबातच नाही. करून मोकळं होणं मी जास्त प्रेफर केलं, मज्जा आली. अहाहा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...