बुधवार, ९ जून, २०२१

वैशिष्ट्य एका कार्यक्रमाचे

"चला हवा येऊ द्या" हा कार्यक्रम आवडतो आम्हा सगळ्यांनाच बघायला आणि एकत्र एन्जॉय करायला. सगळं जगच त्यांचं कौतुक करतंच नेहेमी पण काल त्यांचा एक विशेष कार्यक्रम बघून "गुगल मराठी" वापरून ताबडतोब लिहावसं वाटलंच.

श्रेया बुगडे हि एकमेव मुलगी आहे त्या कार्यक्रमात गेली अनेक वर्ष किंबहुना कार्यक्रमाच्या जन्मापासून बहुतेक. इतकी वर्ष किल्ला लढवणं आव्हानात्मक आहे आणि अचंबित करणार देखील. त्याच साधं सोप्प कारण मला काल उमगलं. डॉ. निलेश म्हटल्याप्रमाणे श्रेया ला कुठलीही व्यक्तिरेखा साकारायला सांगितली कि ती विचारत नाही "तुम्हाला काय अपेक्षित आहे?" "मी काय करू?" "कसे करू?" "काय वेगळं करू" ई. पण ती ताबडतोब तिचा अभ्यास सुरु करते, विविध व्हिडीओ बघते, ऐकते, वाचते आणि अपेक्षेपेक्षा भन्नाट सादरीकरण करते. ह्या कार्यक्रमात सगळेच तस्सेच आहेत, इन्कलुडींग वादक. त्या मुळे विविधता टिकवली जाते, प्रत्येकाचा सहभाग मिळतो आणि एकावर फक्त संपूर्ण भार येत नाही.

माझे आधीचे चेअरमन आम्हाला सांगत असतं, माझ्या कडे सोल्युशन्स (अनेक) घेऊन या, प्रॉब्लेम्स नाही. माझे बाबा पण म्हणायचे "there is something on your shoulders use it". सोल्युशन्स ओरिएंटेड असणं अतिआवश्यक आहे. तरच स्वतःची आणि इतरांची प्रगती निश्चित. नाहीतर अशक्य आणि अवघड सगळेच.

माझ्या सॉफ्टवेअर इंजिनीरिंग मधे सुद्धा हेच सांगितलं जात कि क्लायंट आणि त्याच काम अतिशय महत्वाचं आहे. क्लायंट च्या दृष्टीने नेहेमी विचार करायला हवा. त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त दिलं तर ते सगळ्यांसाठीच फायद्याचं आणि त्याला "value added services" असं गोंडस नाव दिल जात आणि त्यामुळे तो कदाचित "रिपीट क्लायंट" होतो / राहतो. क्लायंट समोर देखील अनेक सोलुशन उभे करणं अतिआवश्यक आहे, आणि त्यातलं सगळ्यात चपराख बसणार सोलुशन देखील सांगता आणि पटवून देता आलं पाहिजे. त्या करता स्वभावच सोलुशन ओरिएंटेड घडवला पाहिजे. असं मला वाटत / पटत आणि हे मी पदोपदी अनुभवलं आहे. 

प्रत्येक घरातील व्यक्ती सोलुशन ओरिएंटेड असेल तर सोन्याहून पिवळे, नाही का. प्रॉब्लेम झाला कसा, कोणामुळे ई. कडे लक्ष न देता पुढे जाण जास्त आवशयक आणि गरजेचं.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...