सोमवार, ७ जून, २०२१

तीर्थ

जेव्हा सगळं सुरळीत सुरु होत २ एक महिन्यांपुर्वी तेव्हा मी माझ्या एका मैत्रिणीबरोबर ऑफिस मधून परत आले घरी तिच्या कार मधून. कार मधे बसल्यावर माझी मैत्रीण म्हणते कशी "तीर्थ घ्या मॅडम, आता हे रुटीन झालाय, कम्पलसरी". देवा.

मी २ पेक्षा जास्त वर्ष झाली असतील प्रत्यक्ष तीर्थ घेऊन, देवळात जाऊन किंवा एखाद्या श्री. सत्यनारायण सारख्या पूजेचं. आणि गेल्या काही वर्षात फारच दुर्मिळ झालाय तीर्थ रेग्युलरली घेणं माझ्यासाठी. कारण देवळात आरतीच्या वेळी फारच कमी जाणं झालाय आणि तीर्थप्रसाद पण थोडा दुर्मिळच. पण ह्या तीर्थाचा महिमा आणि त्याची शक्ती फार आहे. शेवटी संपूर्ण पुजा होईस्तोवर सगळे मंत्रोचार त्या पाण्यावर किंवा पंचामृतावर झालेले असतात. प्राशन करणाऱ्याला आंतरिक आणि रोगप्रतिकारक शक्ती प्राप्त होतेच, अर्थात श्रद्धा असेल तर. असं म्हणतात ना आणि मी अनेकदा हि प्रचिती घेतली आहे कि नेहेमी घरी केला जाणारा शिरा न्याहारी करता आणि प्रसादाचा शिरा ह्यात जमीन-आसामानाचं अंतर असतंच. मंत्रोचारांचे घटक त्या शिऱ्यात सामील झाल्यामुळे तो प्रसाद होतो आणि वेगळीच चव देऊन जातो, तृप्त करतो. योग, प्राणायाम, देवळातील देव दर्शन, तीर्थ प्रसाद, मंत्रोचार ई. सगळंच आंतरिक शक्ती वाढविण्यास आणि टिकविण्यास मदत करतातच.

तसेच सध्या बाह्य शक्ती पण तितकीच महत्वाची ठरते आहे. त्यामुळे असेल कदाचित तीर्थाची उपमा ह्या सॅनिटायझर ला प्राप्त झाली आहे. हात, बाहेरून घरी येणाऱ्या प्रत्येक वस्तू, माणसं (सॅनिटायझर टनेल), चपला, गाडीचे टायर्स, आणि सगळेच सॅनिटायझ करतोय प्रत्येक जण आजकाल. पर्याय नाही आहे. असो पुन्हा सगळं लवकरच पूर्वपदावर येवो आणि फक्त ओरिजिनल तीर्थ घ्यावं लागो / फक्त तीर्थ घेण्याची सोय होऊ दे हि ईशचरणी प्रार्थना.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...