सोमवार, ७ जून, २०२१

बर्फासारखे शां$$$$$त


आमच्या शेजारी एवढ्यातच नवीन कुटुंब येतंय राहायला. ३-४ दिवसात शिफ्ट होतील. सध्या घराची साफसफाई सुरु आहे. ते तसे तळेगाव दाभाडे चे, पण मुलासाठी हे  घर घेतले आहे. मुलगा अमेरिकेत वास्तव्याला आहे, सध्या लग्नासाठी आला आहे आणि सद्यपरिस्थितीत ताबडतोब काही जाणार नाही परत. मुलगा अमेरिकेत उच्च शिक्षण घ्यायला गेला होता आणि त्यानंतर तेथेच नोकरी मिळाली, स्थायिक झाला. नवीन सून पण उच्च विद्याविभूषित, भल्या मोठ्या कंपनीत काम करते आहे. परवा आले दोघे काही पावसाळ्याची काम करून घेण्यास ऑल द वे तळेगाव हुन. ते काम करणारे पण पोचले आणि बघतात तर काय पुण्याच्या घराची चावी तळेगावात विसरली. आईला फोन केला आणि सांगितलं मोठ्याने रस्त्यावर उभे राहून, त्यामुळे मला ऐकू आलं. गाडी काढली दोघांनी, गेले तळेगाव ला, चावी घेऊन परत आले आणि मग कामे आटोपली. उच्च विद्याविभूषित दोघे, अतिशय नावाजलेल्या कंपनीत काम करणारे, चावी कसे विसरले? हा एक मोठा यक्ष प्रश्न? आई त्याहून शांत, या परत म्हणाली, देवा. काय लोकं आहेत खरंच. ओरडा नाही आरडी नाही शांतता सगळीकडे, हे मात्र आवडलं मला. 

मी जेव्हा हे सगळे माझ्या लेकीला सांगितले तेव्हा म्हणते कशी, "वेडे आहेत का? पुह्ना इतक्या दूर का जायचं? चावी वाल्याला बोलवायचं आणि नवीन चावी करून घ्यायची, सिम्पल. मग तीच चावी शेजारी ठेवायची किंवा गाडीत. वेळ पैसे तेवढे च लागणार होते". चांगलं डोकं चालवलाय पोरीने. आवडलं मला. लई भारी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...