रविवार, १३ जून, २०२१

बुटात पाय

 बालपणी म्हणजे साधारणतः पाय फुटल्यावर / एक-सव्वा वर्षाची मुलांची एक सवय असते. किंबहुना त्यांना आणि आई वडिलांना त्याची खूप गम्मत हि वाटते. मीही आणि माझी मुले हि काही वेगळी नव्हती. आमची मुले लहान असतांना आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो, बुटांचे कपाट नव्हते. त्यामुळे चपला बूट खोलीतच जमिनीवर ठेवायचो. मौक्का मिळाला कि दोन्ही पोरं इवलुश्या त्यांच्या पायात भली मोठी गोष्ट घालून फिरायची, बागडयाची,धडपडायची ....काहीतरी मोठ्ठ केल्याचा आनंद मिळायचा त्यांना. खूपच छान सोहोळा होता तो. माझे बाबा हि अश्या आठवणी सांगायचे कितीतरी.... माझ्या लहानपणीच्या...

आता ..

काही दिवसापूर्वी वेद नी नवीन कॅरॉक्स आणले. नवीन पद्धतीचे आणि म्हणतो कसा ममा तू घालून बघ ना, मी पण उत्साहात घातले, तर म्हणतो कसा असं वाटतंय कि लहान मुलांनी बाबांचे कॅरॉक्स घातलेत.... आणि किती मज्जा आली त्याला, माझे त्या मानानी छोटे पाय त्याच्या भल्या मोठ्या बुटात... देवा...लहान होण्याची मज्जा काही औरच !!!

एक चक्र पूर्ण झाल्यासारखं वाटलं, इथेच...

असेच मोठ्ठे व्हा आणि ह्याच बुटात पाय जमिनीवरच राहतील हे निश्चित बघा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...