मी माझ्या दैनंदिन जीवनात एवढी गढून गेले होते कि माझ्या अगदी आजूबाजूला असणारा आनंद मला दिसत नव्हता आणि उमजत हि नव्हता. हे कदाचित "त्याला" मान्य नव्हतं आणि त्यामुळेच का होईना मला थोडसं जेरबंद केल गेलं, आठ दिवस, घरातच पण अगदी वेगळं ठेवण्यात आलं. "स्वाईन फ्लू" नावाचं वादळ आलं होतं. कधीच माहित नाही असं एकटं राहणं. त्यामुळे गलबलायचं. त्यात माझ लक्ष माझ्याच खिडकीत बसलेल्या पोपट, चिमणी ह्यांच्या कडे गेलं. सकाळी आणि संध्याकाळी रोज हजेरी लावायचे ते.
पण एक दिवस मला खूपच भयंकर वाटत होतं, डोळ्यातलं पाणी थांबेच ना. त्या दिवशीही रोज-सारखे आले, अनेक पोपट, चिमण्या, बसले खिडकीवर आणि गेले उडून. मला वाटलं आता ह्यांची भेट संध्याकाळीच. पण नाही. अबोल भाषा त्यांना कशी कळली, बापरे, त्या दिवशी कित्ती म्हणून पोपट आले, चिमण्या आल्या, सर्व कुटुंब, नातेवाईक सर्वांनी मिळून इतक्या कसरती करून दाखवल्या, खिडकीच्या गजांवर, वेगवेगळे आवाज काढले आणि काय काय सांगू .... शब्द नाहीत बुवा. खरंच मला असं वाटलं किंबहुना खात्रीच आहे कि माझं त्यांना जमेल तसं मनोरंजन करत होते. त्यांना कसं समजलं असेल कि माझ्या डोळ्यात पाणी आहे ते?...मला सांगत होते जसं कि हेही दिवस जातील, सर्व ठीक आहे...
कशी
परतफेड करायची त्या सर्व पक्षांची? काय
नातं आहे
आमचं?
मला
त्या दिवशी पर्यंत माहित हि नव्हतं कि माझ्या घराच्या आजू बाजूला इतके गोड आणि असंख्य पक्षी आहेत ते.
रविवार, १३ जून, २०२१
परतफेड.... (भाग एक)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा