रविवार, १३ जून, २०२१

परतफेड... (भाग २)

आमच्याकडे बरीच वर्ष झाले एक मावशी काम करतात, आजी आहेत. आता त्यांच्या कुटुंबाला आम्ही आणि आम्हाला त्यांच्याकडचे सगळेच ठाऊक झाले आहे. माझ्या आजारपणा विषयी मावशी घरी बोलत असतील. एक दिवस मला आजोबांचा (मावशींच्या अहोंचा) फोन आला तब्बेतीबद्दल विचारायला. थोडेसेच बोललेले असतील आणि त्यांनी फोन मावशींना दिला. त्यांना पुढे बोलताच आले नाही. "असं कसं झाला तुम्हाला" एवढं म्हणून डोळ्यात पाणी आलं.

दररोज मावशी मला असंख्य त्यांचे अनुभव सांगत, त्यांना जमेल तसे पाय चेपून देत, नारळ पाणी आणून देत, जेव्हा मला पायाचे दुखणे असैह्या व्हायचं. कित्ती दिवस सतत माझं केलं मावशींनी.

तसं पहायला गेलं तर आम्ही कोण कोणाचे बरं. मावशी तरी माझ्या कडे काम करतात, आजोबांना वाईट वाटण्याचे काय कारण. त्यांना फोन करण्याचे तरी काय कारण? खरं तर काहीच नाही. पण तरी ऋणानुबंध असतात हे खरंच. ह्या दोघांची परतफेड कशी करावी, काही कल्पना आहेत डोक्यात, संपूर्ण बरं वाटलं कि प्रत्यक्षात आणीन.

Nov 16, 2018, 4:55 PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...