रविवार, १३ जून, २०२१

इकडची मम्मा आणि तिकडचीही मम्म्माच

समस्त मोठया मंडळींना स्मरून आणि त्यांचा पूर्ण आदर ठेवूनच मी आज हे लिहीत आहे कारण आज ते माझ्या सुपीक डोक्यात आलं आहे, ह्या आधी कधीहि आलं नव्हतं, का? ते नाही माहित.

आपल्या मराठीत बाप्पा ला किंवा देवांना आपण अरे-तुरे संबोधतो, त्याचा अर्थ त्यांचा आदर नाही असं नाही, बरोबर?


आपल्या त्याच मराठीत जन्म दात्या आई ला हि अगं म्हणतो. आता चित्र बदलतांना दिसतंय खरं, आणि चांगलं चित्र असेल ते कदाचित अशी अपेक्षा करूयात.

थोड्याश्या जुन्या काळी, जसं की मागच्याच पिढीत सासू बाईंना मात्र अहो-आई असं म्हणायची रीत होती, नवराल्या सुद्धा ... म्हणजे हे सर्व, म्हणजे आई आणि नवरा,  देव आणि जन्म दात्या आई पेक्षा मोठे का? अहो-जाहो करण्यात काहीच वावगं नाही, अजिबातच नाही, पण थोडीशी जी जबरदस्ती होत होती ती काही बरी नव्हती....

असो, तो काळ गेला आता. आज काळ तर मम्म्मा ह्या शब्दाचा, जो खरंच सुखावह आहे, इकडची मम्मा आणि तिकडचीही मम्म्माच, बेस.

अमेरिकेत आणि काही मोठया आंतरराष्ट्रीय कंपन्या मध्ये पहिल्या दिवशीच घोषित करतात कि त्या व्यक्तीला कस संबोधित करायचा, सर / मॅडम असं नसतंच. किती मोकळं ते वातावरण ..... हो हो त्यात मी पण होतेच, पहिल्यांदा मी ते अनुभवलं आणि सगळ्यांना सांगतील कि मला कसं बोलवायचं, हाक मारायची ते. भन्नाट.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...