बुधवार, ९ जून, २०२१

काय वर्णू तव गुण अल्पमती नारायण...

 माझी एक मैत्रीण तिची कथा कथन करत होती. ती अशी. माझ्या मैत्रिणीला जर खूपच कचेरीतल काम होत आणि त्यात ती आजारी पडली. त्यामुळे जेवढी शक्ती होती ते तिने कचेरीतल्या कामासाठी वापरायची ठरवली. झालं मग काय तिला वाटल कि नवऱ्या ला सांगावं थोडं घरच काम करायला. खरंतर तिला अस म्हणायचं होत कि का सांगू मी नवऱ्याला घर काम बद्दल, तो परिस्थिती समजून करेलच कि. पण तशी चिंन्ह काही दिसली नाहीत म्हणून तिनी भाजी आणण्यास सांगितलं, सुरवात म्हणून, किंवा सोप्पं काम म्हणून. दोन वेळेला नवरोबांनी तिच्या भाजी आणली, आणि दोन्ही वेळेला घरी आल्या आल्या पिशवी कौतुकाने दिली आणि हिने बघितली तर, एक पालक गड्डी, एक मेथी गड्डी आणि एक कोथिंबिरीची जुडी. बास. दिवसांच्या अंतराने मदत म्हणून आणलेली भाजी (दोन्ही वेळेला फक्त तेच), घरच्या मालकाने. देवा. मी हे ऐकून निशब्द झाले.

दररोज भरल ताट आयत हातात मिळत, त्यात माझी मैत्रीण ठरली आमच्या खास नागपूरची, आणि खवैयी, त्यामुळे अनेक प्रकार होतंच असतात वेळोवेळी. नोकरी सांभाळून बाई कडून वैविध्य पदार्थ करून घेणे, खाऊ घालणे . सगळं अविरत चालूच आहे तिच्या घरी. हे सर्व काय फक्त हिरव्या पालेभाज्या आणल्या कि होत? का असे असतात आणि वागतात खरंच कळत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...