बुधवार, ९ जून, २०२१

कलियुगातले जायफळ ...

 
काल माझ्या थकव्याची परिसीमा होती, फार थकल्यामुळे रात्रभर झोपायचं होत मला. त्यात गेले दोन रात्र चांगली झोप झाली नव्हती, म्हणून घरचा उपाय शोधायच ठरवलं. आणि डोक्यात प्रकाश पडला. थोडेसे जायफळ किसून घातले गरम दुधात आणि गटकन पिऊन झोपले. पण कसल काय. फार फरक नाही पडला. जायफळ हि कलियुगातील; त्यामुळे गुणधर्म बदलेले आढळले, खरंच . झोपेचा रामबाण इलाज असा माझा (गैर)समज होता पण मला नाही उपयोगी पडला.

आश्चर्य अस कि हेच जायफळ घालून मी जेव्हा पूरण पोळ्या करते तेव्हा मस्त झोप लागते मला. हे कस काय, कोडंच आहे? म्हणजे आता काय मी पूरणपोळी खाऊन झोपायला हवं होत, तेही रात्री? देवा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...