बुधवार, ९ जून, २०२१

आगळे वेगळे हळदी कुंकु कार्यक्रम...

आज संध्याकाळी सहज TV वरच्या सोनी वाहिनी वर असणारा कार्यक्रम "साई" बघत होते. खूप दिवसांनी बघितला हा कार्यक्रम. त्यात विशेष अस काही बघायला मिळालं आज. आणि ते हि रथ सप्तमी दिवशी. अचानक कुठून तरी ऊर्जा आल्यासारखी वाटली.

आजच्या भागात हळदी कुंकवाचा बेत दाखवला. गावातल्या साधारणतः १५-२० बायकांनी मिळून हातात मोठ्या थाळीत काही तरी झाकून आणल होत. त्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष हळदी कुंकू द्यायला सुरवात केली सवाष्णींनी तेव्हा त्यात (भल्या मोठ्या तबकात) अस आढळलं: तिळगुळ वड्या / लाडू होते, वाण होते आणि करंडा होता. अप्रतिम कल्पना आहे नाही? पुढल्या वर्षी बघू जमल्यास मी हे असेच हळदी कुंकू करेन, सर्वांचे मिळून एक, एकत्र असे. त्याच ठिकाणी प्रत्येकीने सर्वांना हळदी कुंकू लावायचे, वाण द्यायचे, तिळगुळ खाऊ घालायचा वगैरे.सहीच.

धमाल, वेगळ काहीतरी. धन्य ते लेखक आणि धन्य त्यांचे वेगळे विचार. नाही तर प्रत्येक घरी वेगवेगळ्या दिवशी (साधारणतः एखाद महिना चालणार) करण्याचा हा कार्यक्रम. सर्वांची भेट, हसणं खेळणं महत्वाचं, नाही का?

पुढल्या वर्षी एक असा नवीन प्रयोग कचेरीत आणि दुसरा घरी; ठरल तर. पक्क. बर झाला मी हे बघितल आज.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...