शनिवार, ५ जून, २०२१

पहिला नंबर

 एव्हढ्यातच जगप्रसिद्ध टी-२० नामक वादळाचा अंत झाला (शेवटी एकदाचा), ह्या वर्षापुरता. त्या सगळ्या लढाया बघत असतानां एक लक्षात आलं कि प्रत्येक टीमचा मालक त्याच्या टीमला प्रोत्साहन नक्कीच देत असणार, प्रसिद्ध आणि अनुभवी प्रशिक्षक पुरवत असणार, त्यांच्या खाण्या-पिण्याची चोख व्यवस्था ठेवत असणार आणि सर्वोतोपरी काळजी करत असणारच. वादच नाही. पण सरते शेवटी फक्त एकच टीम जिंकली, असा का बर? सगळेच खेळाडू, प्रत्येक टीम जर पराकोटीची मेहेनत घेत आहे (होती) तर मग असं का घडलं. हा जगाचा नियम आहे. सगळेच जण जर पहिले आले तर बाकी स्थान तर रिक्तच राहणार.

आज प्रेत्येक विद्यार्थी जर म्हणाला कि मला फक्त डॉक्टर व्हायचं आहे तर बाकी व्यवसाय कोण बघणार. शेवटी जगाला सगळ्या प्रकारची माणसं हवीच आहेत. थोर मोठे लहान प्रसिद्ध....

प्रेत्येक शेतकरी मशागत करतो, प्रचंड अंगमेहेनत करतो, खत-पाणी घालतो, पैशांची जमवा जमव करतो, पण शेवटी बाजारपेठ कशी मिळते हे गुपितच आहे, नाही का? पाऊस किती पडतो, पीक किती येते, कीड धरणार का, असे असंख्य अनुत्तरित प्रश्न आहेतच.

मी एवढ्यातच काही सुशिक्षित वडिलांना बोलताना ऐकलं. त्या सर्व वडील मंडळींची मुले फार छान टक्क्यांनी उत्तीर्ण झाली आहेत. अगदी पहिली नाही आलीत, पण ताठ मानेने सांगता येईल इतके सुंदर % मिळवले आहेत मुलांनी. त्या पालकांचं म्हणणं असं कि घर आहे, गाडी आहे, फी भरली आहे, जेवण खाण आणि सगळं सगळं मिळत असून जगात पहिला नंबर का नाही आणला मुलांनी? मी ऐकूनच अवाक झाले आणि अर्थातच संपूर्णपणे अनुत्तरित आह.

तुम्हाला काय वाटत मंडळी ह्या बद्दल...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...