माझ्या शैक्षणिक काळात ग्रंथालयाला फारच महत्व होत. पुस्तक वाचणं, त्याच्यातले महत्वाचं मुद्दे काढणं, ते लिहिणं / टिपून ठेवणं, आणि जो वर पूर्ण माहिती मिळत नाही तोवर विविध पुस्तक शोधत राहणं हि एक महत्वाची रोजनिशीतली गोष्ट होती. अगदी स्नातकोत्तर पदवी मिळे पर्यंत. पुस्तकाचा स्पर्श, सुगंध, त्याचा काहीच दिवसाचा सहवास ई. फारच महत्वाचं होतं, खरंच. त्यामुळे कि काय "ग्रंथ-संपदा" हा अगदी मनावर बिंबलेला असा शब्द आहे.
मी मनात येईल ते लिहीत असते FB वर आणि माझे काही वाचक किंवा ज्यांना माहित आहे कि मी काहीबाही लिहीत असते, त्यांचे कधी कधी प्रश्न असतात, कि मी का लिहिते? वेळ कसा मिळतो? काय मिळत लिहून? इतक्या छोट्या विषयावर किंवा कधी कधी विषय फारसा महत्वाचा नसूनही का लिहिता? ई.
मग मी ही विचार करायला लागले कि मी का लिहिते, आणि बरीच छान उत्तरे मिळाली. त्यात एक उत्तर मलाच आवडलं म्हणून म्हटलं लिहिते. मोठे मोठे लेखक, अभ्यासक, संशोधक, ज्ञानी मंडळी ग्रंथ, पुस्तक आणि बरीच ज्ञान-संपदा उभी करतात. तशीच छोटीशी माझीही कधी तरी सार-संपदा / लेख-संपदा तयार होईल आणि कदाचित उपयोगी पडेल कोणाला तरी, म्हणून हि धडपड,अजून काही नाही.
शनिवार, ५ जून, २०२१
Precis संपदा.... (सार-संपदा)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा