माझी एक मैत्रीण सध्या नागपूरला एका नातेवाईकच्या लग्नासाठी गेली आहे. तिच्याशी आज बोलणं झालं साहजिकच नागपूरच्या प्रसिद्ध उन्हाळ्याबद्दल. आणि मग काय माझ्या सुंदरश्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. कुठे कुठे पोचले मी माझ्या स्मृती पटलावर, अहाहा. कस धन्यवाद म्हणावं माझ्या मैत्रिणीला हेच कळत नाही. तर ती सांगत होती कि आज सगळ्यांनी लग्न खूप खूप एन्जॉय केलं, प्रचंड ऊन असतांना देखील त्याच महत्वाचं कारण म्हणजे लग्नाच वातानुकूलित सभागृह. काय?
आम्ही लहानपणी जी लग्न सभागृह बघितली आहेत त्यात भले मोठे डेसर्ट कुलर्स असायचे, बर्फाचे डोंगर मोठाल्या पाण्याच्या पिंपांत आणून टाकलेले असायचे. आणि आमच्या टोळीच काम मस्त असायचं सारखं सारखं बर्फ खायचं, थंड पाणी प्यायचं, कूलर समोर जाऊन उभं राहायचं आणि हे चक्र असच चालू राहायचं. कारण लग्नात कोणाला स्वारस्य असायचं. धावायचं, मज्जा करायची. भरपूर खायचं अजिबात नखरे न करता आणि हे सगळं करतांना ऊन कधीच मध्ये नाही आलं. थोडं मोठे झालो तेव्हा मग थोडं रुखवत मांडायला मदत करायचो, कधी कधी साडी नेसवायला मदत कर, तर थर्मोकोल ची नाव कर आणि बरेच काही. कुठलाही काम जमायचं, एकंदरीत काय मज्जा यायची. पंक्ती, रांगोळ्या, लाडू-चिवडा, पेढे आणि बरच काही. "बूभुकक्षितांची फेफे = बूफे" चे फ्याड नंतर चालू झालं.
असो. नागपूरकर आता
लवकर बोलवा मला, वातानुकूलित सभागृहचा आनंद घ्यायचा आहे.
शनिवार, ५ जून, २०२१
माझ्या नागपूरचं आजकालचं लग्न...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा