शनिवार, ५ जून, २०२१

पास्ट कर्मा

एवढ्यातच आणि बहुतेक प्रथमच एक आगळा-वेगळा निर्णय १२ विच्या परीक्षेच्या बाबतीत घेण्यात आला. परीक्षा होणार नाही म्हटल्यावर अनेक जणांना हायसं वाटलं आणि आता प्रतीक्षा आहे ती मग सरतेशेवटी १२ वीचे मार्क्स कसे दिले जाणार त्याची. तीन पर्याय ऐकिवात आहेत, १. १२ वीचे कनटीन्यूअस असेसमेंट्स घेतलेले आहेत वर्षभर प्रत्येक विषयाचे त्याचे मार्क्स द्यायचे, २. ११-१२ मिळून ऍव्हरेज करायचे, ३. ऑनलाईन छोटेखानी परीक्षा घ्यायची आणि त्याचे पण मार्क्स १. ला जोडायचे असं काहीतरी भलतं.

काहीका ठरवेनात मोठी लोक, आता तरी सर्वांना पटलं असेल कि पास्ट कर्मा अप्रतिम ठेवणं, ढिलाई न होता, आळस न करता नेहेमीच प्रत्येक अटेम्प्ट attempt best उत्कृष्ट देणं आवश्यक आहे. आजकाल ची पिढी थोडीशी ऑपशन्स वर भर देतेच. का कुणास ठाऊक? उदाहरणार्थ ५ कनटीन्यूअस असेसमेंट्स (Continuous assessments) पैकी शेवटचं चांगलं करू, एखाद दोन नाही केले तरी काय फरक पडतो, हे मार्क्स थोडीच बोर्डात काउन्ट होणार आहेत? ई. आता बसा.

हे फक्त ह्या वर्षीच किंवा १२ विच्या परीक्षेपुरतं मर्यादित नाही मंडळी तर सर्वत्र लागू पडत, प्रत्येक अडचणीत, प्रसंगात (चांगल्या वाईट दोन्ही बरं का) मागचे उत्कृष्ट कर्मच कामाला येतात,  जसे कि मित्रपरिवार, मदत केलेली, बचत केलेली, चांगले विचार आणि आचार, पेरलेलं, कष्ट केलेले, उभं केलेल, साठवलेले, वाचलेलं, ऐकलेले आणि असेच बरेच काही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...