तसे बघायला गेले तर माझ्या घरी लहानपणी पासून थालिपीठ तव्यावर थापून आणि भाज्या कणकेत मिक्स करून केलेले पराठे मला आठवतात. पालक पराठा म्हणजे कणकेत पालक मिसळून लाटून भाजून केलेला पराठा. तेच मेथीचं, कोबीचं, मुळ्याच, दुधीचं ई. कधी कधी मेथी आणि मुळा किसून थोडा परतवून त्यात डाळीचे पीठ पेरले जाई आणि ते भरणं भरून पराठे केले जात असत. आणि हे पराठे देखील पोळी सारखेच, जास्त जाड नाहीच. कणकेत भाज्या मिक्स करून केलेले पराठे कधी कधी धपाटे असे संबोधले जात. आमच्या कडे नाही पण ऐकिवात आहे.
माझा एवढाच काय तो परिचय पराठे ह्या सांज्ञेशी.
दिल्ली ला राहायला गेल्यावर एका लग्नानिमित्य आणि आमच्या शेजारी एक पंजाबी कुटुंब राहायला आल्यावर त्यांचे भरभक्कम जाड असे पराठे चाखायला मिळाले ज्यात मिक्स व्हेज, पनीर असे घटक प्रकर्षाने असतं. मी अनेकदा पंजाबी प्रकाराने जास्त भरणं घालून जाड करण्याचा अयशश्वी प्रयन्त केला, पण तो पराठा शेवटी पोळीपेक्षा थोडासा किंचित जाड म्हणावा असा झाला. असो. माझ्या हातानां तशीच सवय झाली आहे.
माझ्या दृष्टीने मराठी प्रकाराने किंवा पंजाबी प्रकाराने पराठे केले काय दोन्ही मधे शेवटी भाज्या कणकेशी एकजीव होतातच, नाही का?
अस्सेच असावे आपल्या कामाशी पराठ्यासारखे, ह्या पद्धतीने करा किंवा त्या पद्धतीने, पण एकजीव होणं, समरस होणं अतिशय महत्वाचं. अर्थात चव पण राखली पाहिजे. तेच नात्याचं पण आहे, पराठे बटर ने शेका, नाहीतर तुपाने किंवा लोण्याने, जशी गरज आणि उपलब्धता, नात्यातला चविष्टपणा कायम राखा म्हणजे झालं. मग ते नातं घरच, दारच, बाहेरच, कायमच किंवा तात्पुरतं (तात्पुरतं म्हणजे एका कार्यक्रमात भेटलेले, एका कॉन्फरन्स मधे गाठ पडलेले ई).
तुमचं मंडळी मला माहित नाही, पण कुठे समजतं हो कि पराठा स्टफ पद्धतीने केलाय कि मिक्स? जाडी बदलते कदाचित, पण पापुद्रा उघडून बघितला तर भाज्या छान एकमेकांना आणि पोळीच्या आवरणाला चिकटलेल्या असतात. आणि जाणून तरी का घ्यायचं ना? चविष्ट आहे ना, भुकेच्या वेळी वेळेवर मिळाला ना बास. तसेच कामाचे, नात्याचे ई. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत, वेग, आकलन सगळं वेगळं असत. माझ्या दृष्टीने काम वेळेत चांगलं होण्याशी मतलब. तुम्हाला काय वाटत मित्रांनो?
शनिवार, ५ जून, २०२१
मराठी पद्धतीचा पराठा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा