माझ्या आईला प्रासादिक आशीर्वाद लाभलेला आहे. ती एक उत्तम कवयत्री आहे, अनेक / अगणित अशी भजने तिने लिहिली आहेत. संपूर्ण गुरुचरित्र ओवीबद्ध केले आहे.
मागल्या एक दिड महिन्यात एक WhatsApp ग्रुप तयार झाला आणि मला त्यात कोणी add केले काही कल्पना नाही. सहज म्हंणून मी माझ्या आईच्या भजनांचा विषय काढला आणि आमचा एक छोटेखानी ग्रुप तय्यार झाला. सगळ्यात महत्वाचा म्हणजे जितकी भजन CD मध्ये रेकॉर्ड केली होती तितकीच मंडळी जमली. त्यात "MNC" मध्ये काम करणारे बासरी, तबला आणि पेटी वादक तय्यार झाले देखील, समजण्याच्या आतच. "शब्दांच्या पलीकडले .....", अगदी.
आता
जोमात भजनांची उजळणी / सत्संग चालू आहे. तेवढीच तिच्या कार्याची आठवण आणि
साभार छोटीशी पोच.
"नाही ताल
राग
ज्ञान कंठ
सुस्वर..." अशी
स्तिथी आहे
खरी; पण आम्ही काही सोडत नाही. प्रयन्त जारी आहेत. तालमधुर अशी भजने म्हणायची ठरवली आहेत दत्तजयंती निमित्य, घरीच. बघुयात, हा छोटासा प्रयन्त कशी फळे दितोय ते.
पण सगळेच आश्चर्य आहे, मी घरी आहे काय, Group तय्यार होतो काय, सत्संग घडतो काय आणि समविचारी लोक एकत्र येतात काय.... सगळे उत्साही गायक आहेत, कोणीही प्रशिक्षण घेतलं नाही. साथसंगत मात्र प्रसिद्ध वाजवणारे आहेत. खरोखर आश्चर्यच आहे.
माझही पायाच्या दुखण्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतंय, नवीन मंडळींच्या संपर्कात आल्यामुळे बरेच नवीन विषय निघाले, कार्यक्रम करायचा म्हणजे अनेक कामे आलीच, तेवढंच काय
उजळणी म्हणजे सर्वांना गाणे समजावून सांगणे, त्यामागचा मतितार्थ सांगणे, कुठल्या पट्टीत बसवायचं हे ठरवणे आणि बरंच काही.
"त्याने" मला
बरं
करायचं ठरवलंच आहे, सर्वतोपरी "त्याचे" प्रयन्त चालले आहेत, जोमाने. मनापासून शतशः धन्यवाद..
आईच
कार्य अजून लोकांपर्यंत पोचावे हीच
प्रभू चरणी प्रार्थना.
Dec
8, 2018, 3:22 PM, wrote on FB Wall.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा