ह्या दिवसात बहुतेक रोजच माझ्या दोन्ही आया
मला
फोन
करतातच. त्यांना राहवत नाहीच. माझ्या आईंना (सासूबाई) तर नीटसं ऐकू हि येत नाही पण त्या फोन करायचा सोडत नाहीत. बहुतेक प्रत्येक फोनचा मजकूर तसा ठरलेलाच असतो पण खूपच सकारात्मक असतो. बऱ्याच सूचनाही असतात तब्येतीची काळजी घेण्याच्या.
माझी आई म्हणजे विचारपूस / सूचना + असंख्य विषयांवर गप्पा, आम्हा दोघींना आवडणारा विषय तो. अनेक अनुभव कथन करणे हे हि तिच्या आवडीचे. भन्नाट वाटतं.
"बोलणे उपचार / Talk Therapy" हि एक उपयोगी पद्धत आहे म्हणतात नसांशी निगडित आजारातून पट्टाकिनी बाहेर पडण्यासाठी. एवढ्यातच माझी मैत्रीण दिपाली दोनदा येऊन बराच वेळ गप्पा मारून गेली, नीलिमा सांगलीहून आली तर मंज्या उर्फ मंजिरी सिहंगड हुन, आल्या पोटभर आठवणी ना उजाळा मिळाला. खूप बरं वाटलं.
हळीव, पंच
खाद्य, पौस्टिक, डिंक ई. प्रकारचे लाडू आलटून पालटून खाणं चाललंय सध्या. सुबक दिसणारे, चविस्ट असे
लाडू ज्या हातानी तय्यार केले त्यांना दंडवत, खरंच. कारण मी असं ऐकलं आणि वाचलं आहे कि व्हिटॅमिन च्या गोळ्यातुन मिळालेले घटक संपूर्णपणे शरीरात शोषले जात नाहीत. पण पौस्टिक पदार्थातून मिळालेले जास्त फायदेशीर असतात. काही मापदंड नाहीत हे सिद्ध करायला. पण मस्त वाटतंय हे नक्कीच.
माझे सर्व विद्यार्थी हि घरी आले भेटायला, हातात बराच वेळ घेऊन, आणि खूप जुन्या आठवणी निघाल्या, नवीन विषयांवर चर्चा झाली, हसणं झाला, व्वा व्वा... काय वर्णू... असं झालंय मला.
अनेक डॉक्टर नि ही वेळ दिला (घरी दारी), ऐकलं, अनेक आरोग्याचा टिप्स दिल्या. जरी त्यांचे शुल्क घेतले, तरी पण "All the way" येणं ... मला आवडून गेलं.
प्रत्येक मावशींनी नेमल्यापेक्षा जास्त वेळ
दिला मला, बोलायला, खाऊ
घालायला, किस्से सांगण्याला, जास्तीची कामे करण्यासाठी ई... खरंच पुन्हा एकदा "काय
वर्णू तव गुण..." असा झालंय मला.
प्रत्येकाचे आशीर्वाद / गुड
विशेष निराशा टाळण्यास, लवकर बरं होण्यास प्रचंड मदत करत आहेत. मला त्यांच्या विचारात ठेवलंय हि एक मोठ्ठ समाधान देणारी गोष्ट आहे. मलाही अश्या प्रेरणादाई गप्पा मारता याव्यात, दुसरांसाठी वेळ काढता यावा हीच अपेक्षा.
रविवार, १३ जून, २०२१
आशीर्वादमय परतफेड ... (भाग १३)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा