मला
थंडी फार
फार
वाजते, का कुणास ठाऊक आणि मी शिक्षक असल्यामुळे तास झाला कि एक कप चहा तर हवाच. म्हणजे प्रश्नच नाही. तसा बाराही महिने मला चालणारे हे पेय आहे, पण थंडीत जरा जास्त आठवण येते. माझ्या फिसिओ थेरपी डॉक्टर कडे गेलं कि त्या "चहा घ्या...." असच म्हणतात, "घेणार का?..." असा प्रस्न नाही विचारत, कदाचित त्या माझ्या नागपूरच्या असल्यामुळे असेल. मी बहुतेक वेळा नाहीच म्हणते पण एक दिवस मी चहा घेतला आणि मग काय.....
माझ्या काही दिवसापूर्वीच्या लिखाणात मी शोधून लिहिल होत कि मला "वाघ बकरी चहा" हे नाव का आवडल नव्हे मी का प्रेमातच पडले ते, कारण मला उत्सुकता होती कि दोन्ही प्राण्यांचा चहाशी अर्थाअर्थी काही संबंध नाही, मग हे नाव का, वगैरे....
त्या दिवशी फिसिओ थेरपी डॉक्टर कडे
चहा
घेतल्यावर मी पुन्हा एकदा "वाघ बकरी चहा" च्या प्रेमात पडले, ह्या वेळी नावामुळे नाही तर चवी मुळे आणि नाविन्यामुळे. झटकीपट चहा होण्याचे कारण कळले मला, "वाघ बकरी चहा" च्या छोट्या छोट्या (sachet) पुड्या मिळतात म्हणे, त्यात सगळे आहे दूध, साखर, चहा, स्वाद...फक्त गरम पाणी घाला आणि प्या. वा वा. नवशिख्याना, नोकरदारांना किती सोयीचा आहे, प्रमाणाचा प्रश्नच नाही, किती साखर घेऊ, कडू झाला.... असे तसे ...
आमच्या सारख्याना चव बदल, बढीयाच.
रविवार, १३ जून, २०२१
थंडीतले आणि शिक्षकांचे आवडते पेय
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा