साधारणतः ७-८ वर्ष्यापुर्वीची गोष्ट असेल. माझी लेक तर खरंच छोटी होती, मी हि छोटी आई होते त्यावेळी. आमच्या एका नातेवाईकांकडे साक्षगंध / साखरपुडा होता. त्यासाठी तय्यार होतांना माझी छकुली म्हणाली आज दोन हातात दोन प्रकारच्या बांगड्या घालुयात दोघी. कारण आम्ही साधारण एकाच रंगांचे पोशाख घेतले होते. इतक झकास दिसले ते म्हणून सांगते, हटकेच एकदम. अक्षरशः प्रत्येकांना आवडले ते. आणि मी तर सातवे आसमानपे... लेक असण्याचे असंख्य फायदे, हे त्यातलंच एक. मी इतकीवर्ष साडी नसते बांगड्या घालते, पण माझ्या डोक्यात कधीच नाही शिरला हा विचार कि दोन हातात दोन वेगळ्या रंगांच्या, साडीच्या मॅचिंग च्या बांगड्या घालाव्यात ते, पण आता पासून फक्त हेच. अहाहा. काय सुचवलंय माझ्या लेकींनी, भन्नाट.
इतक्यात सुरु झालेला एक कार्यक्रम बघितला Dance +4, माझ्या चार डोळ्यांनी तर काय, ती टीव्ही वरची सुंदरीनीही दोन हातात दोन रंगांच्या बांगड्या घातल्या होत्या. वा वा,
चला
एक नवीन विषय मिळाला मला इथे लिहायला आणि आमच्या दोघींच्या अत्यन्त सुंदर आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या.
धन्यवाद त्या टीव्ही कार्यक्रमाचे.
रविवार, १३ जून, २०२१
अनोखी सजावट (fashion)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा