रविवार, ६ जून, २०२१

चालक-मालक

Also written on FB on March 28th 2019.

माझ्या पायांना अजूनही थोडी दगदग सहन होत नसल्यामुळे मी टॅक्सीनीच जाते-येते कचेरीत सध्या. दररोज ची टॅक्सी आणि दररोजचे वैविध्य किस्से, वाहन-चालक, त्यांची नवनवीन गाडी चालवण्याची सवय (चांगली / वाईट)... असो.

काही क्षणात कळतं कि चालक मालक आहे का नाही ते. तिथूनच सुरवात होते, संभाषण करायचं का नाही, व्यवस्थित मार्ग सांगायचं का नाही, PayTM वापरायचं का पैसे द्यायचे, सुट्टे द्यायचे का घायचे आणि बरंच काही.

त्यात बरेच चालक-मालक चांगल्या स्वभावाचे पण आढळले. मीहून बोलले. त्यात काही किस्से समोर आले. काही चालकाचं असं म्हणणं आहे कि रात्री टॅक्सी चालवणं जास्त फायद्याचं आहे, सर्व दृष्टीने. कारण रात्री वातानुकूलित यंत्रणा लागताच नाही त्यामुळे इंधन बचत होते, भाडं जास्त मिळत, बहुतेक विमानतळ किंवा रेल्वे स्टेशन वरूनच असत. त्यामुळे चांगल्या ठिकाणच भाडं मिळत. रस्ते मोकळे असतात, उन्हाचा गाडी चालवण्याचा त्रास होत नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उबेर कडून एक आणीबाणीच बटन दिलय अँप वर. ते दाबलं कि संकटकाळी पोलीस घटना स्थळी ताबोडतोब येतात आणि मदत करतात. त्यामुळे सुरक्षित वाटत.

"
सात च्या आत घरात..." ह्या विचार सरणीतून आलेल्या मला जरा / खूपच वेगळं आणि भयंकर होत हे सगळं. पण शेवटी काम ते कामच . शरीर रचनेची, पचन संस्थेची, झोपेची ... थोडीशी वाट लागत असणार अशी नेहेमीच रात्रपाळी केली तर. नाही का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...