रविवार, ६ जून, २०२१

कंपने .... (vibrations)

हा आमच्या वार्षिक अंकांचा विषय आहे किंबहुना अंकाच शीर्षकही आहे. मला का कुणास ठाऊक पण त्या अंकांत हि लिहायला आवडत आणि म्हणून काही दिवसांपूर्वी माझ्या physiotherapy डॉक्टरनं बरोबर मी माझ्या काही अनुभवावर एक छोटेखानी लेख लिहिलाच. तेव्हा पासून कंपने हा विषय का कुणास ठाऊक पण माझ्या डोक्यात घर करून बसला आहे. त्यात नवीन मालिकेची भर पडली, त्याच शीर्षक काल मी लिहिल्या प्रमाणे एकदम हटके आहे, "मोठी तिची सावली...". आज अचानक घरी गाणे गुणगुणतांना (माझ्या लेकी बरोबर) मला "मिले सूर मेरा तुम्हारा..." आठवलं. आणि ह्या सगळ्यात जर एक सूर, एक ताल, एक लय आणि आवश्यक ती कंपने नसती तर ... असा काहीस माझ्या मनात आलं. "मिले सूर मेरा तुम्हारा..." ची नव्याने ओळख झाली. संपूर्ण पाण्याचे चक्र कसे वास्तव्याशी निगडित आहे हे सोप्या पद्धतीने सांगितले आहे. आमच्या क्षेत्रात शिकवणे, शिकणे, सातत्याने अभ्यास करणे, (छोटास) संशोधन, मैत्री, लिखाण, सतत कामात वैविध्यता, आणि बरंच काही रोजनिशी चे महत्वाचे घटक आहेत. ह्यात सूर सापडला पाहिजे, टिकला पाहिजे... नाही का? अस काहीतरी मी आज माझ्या पिल्लांबरोबर हसत खेळात गात-गात बोलत होते. वेगळीच मज्जा आली. अर्थ पूर्ण जीवनाचं अर्थपूर्ण गीत दिलंय अशोकजी पत्कीनी. त्यांना शत शत प्रणाम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...