गुरुवार, १० जून, २०२१

मार्गक्रमण

 आज ऑफिस च्या बस स्टॉप पर्यंत जाण्याकरता ऑटो बुक केला उबेर वर आणि तो आला काही वेळात मी बसले ऑटोत. पण त्या उबेरला थोडा वेळ लागत होता सुरु होण्याकरिता आणि हे दाखवण्या करता कि नक्की डेस्टिनेशन कुठलं आहे, मार्ग कुठला आहे, कुठली दिशा आहे, किती दूर आहे  अनेक गोष्टी. मी शांतपणे सगळं न्याहाळत बसले होते, आणि विषय लिहावा असं वाटलं.

तर प्रत्येक राईड बुक झाली कि मगच त्या वाहन चालकाला समजत कि कुठे जायचं आहे, मार्ग / रस्ता कुठला आहे, अंतर किती आहे, त्या रस्त्यावर किती उंच सखल भाग आहेत, वळणं आहेत, सिग्नल्स आहेत, किती वेळ लागेल आणि बरेच काही. अगदी आपल्या सारखं नाही का? घर विकत किंवा भाड्याने घेतलं कि मग खरी जर्नी / प्रवास सुरु होतो, आणि अनेक गोष्टींचा उलगडा व्हायला लागतो, त्यात चांगले वाईट प्रसंग आलेच. तसेच काहीसे साखरपुडा / लग्न झाले कि, नवीन गाडी खरेदी केली कि, नवीन बाळ जन्माला आलं कि, नवीन नोकरी सुरु केली कि, आणि असे अनेक प्रसंग येथे मांडता येतील. प्रत्येक दिवस वेगळा आणि नवीन चॅलेंजेस घेऊन येणारा असा. मार्गक्रमण सुरु झालं कि मगच समजत कि त्या मार्गावर किती उंच-सखल भाग आहेत, किती सिग्नल्स आहेत ई. आणि मग त्या पद्धतीने बदल करत स्वतः पुढे कसं जायचं आणि दुसऱ्यांना देखील कसा मार्ग सुचवायचं ते. बरं झालं थोडा वेळ लागला आज उबेर सुरु व्हायला, धन्यवाद, मला सकाळी सकाळी विषय मिळाला लिहायला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...