रविवार, ११ जुलै, २०२१

घरोघरी मातीच्या चुली

काल आम्ही लक्ष्मीनगर नागपुरच्या तीन (अंजु वाहिनी, सोनिया आणि अर्थात मी हो) राण्या एकत्र बोलत होतो फोन वर, बोलत कसल्या नुसत्या हसत होतो, हास्याचा धबधबाच जणु, पण फार ताजतवानं झाल्यासारखं वाटलं. कारणं अनेक आहेत, त्यातली दोन इथे देते आज.

संध्याकाळी बोलत असल्यामुळे "स्वयंपाक झाला का?" हा सहज प्रश्न आला, आणि त्या अनुषंघाने बोलता बोलता वाहिनी सहज म्हणाली कि तिच्या मुलाची आंघोळ झाली कि जेवू. त्यावरून हे लक्षात आलं कि आजकाल अंघोळीच्या वेळा भयानक बदलेल्या आहेत ह्या सगळ्या मुलांच्या. त्या पुढचं आमचं तिघींचं बोलणं असं होत कि रात्री जास्त जगतात हि मुलं, त्यामुळे साहजिकच सकाळी उशिरा उठणं आणि मग त्यांच्या पद्धतीने दिवस व्यतीत केला जातो. विचारलं तर वकिलासारखा प्रश्न ताबडतोब विचारला जातोच "सकाळीच का अंघोळ करायची? लवकर का उठायचं?" ई आणि अनेक. देवा. प्रत्येकाकडेच असेच असेल असे नाही, पण काही घरात किंबहुना अनेकदा ऐकण्यात, वाचण्यात आलेला हा बदल आहेच. मी अनेकदा असं ऐकलं आहे कि संध्याकाळी म्हणे जिम जास्त भरलेल्या असतात नॉर्मल दिवसात. असो. ऐकावं ते नवलच आणि "बदल हाच एक स्थिर असतो" असं म्हणतात ते खर आहे हे नक्की.

अनेकदा / बहुतांशी घरी माझ्या मुलांशी संवाद साधतांना मी मराठी म्हणी सहज वापरतेच. एवढ्यातच "घरोघरी मातीच्या चुली" जेव्हा मी उच्चारलं तर लेक म्हणते कशी, "ह्याचा काय अर्थ मम्मा?". हा वर लिहिलेला प्रसंग आणि होणार बदल सर्वत्र आढळला, माझ्या घरच्या सारखीच हि बाकी घर आहेत, त्यामुळे, सगळीकडे सगळं सारखंच आढळून येतंय,
"घरोघरी मातीच्या चुली".  

अर्थात हा वर लिहिलेला एक प्रसंग झाला, असे अनेक साम्य आढळते ह्या पिढीत. आणि अर्थात सध्याची ती गरज आहे. सगळेच "खाली मुंडी पाताळ धुंडी" जसे. सर्वत्र तेच दृश्य, काहीही बदल नाहीच. माझ्या लहानपणी असले सगळे फोन,इंटरनेट, सोशल नेटवर्क ई. नसल्यामुळे प्रत्यक्ष भेट, मैदानी खेळ हे होत. "प्रवाह पतित" होणं आलंच. "घरोघरी मातीच्या चुली" हेच खरं.

ह्या पिढीच्या मुलांच्या अंगिकारलेल्या सवयी काहीही असोत, पण आपण शिकवलेलं अगदीच वाया जात नाहीच. हवं तेव्हा अगदी तोंडात बोट घालण्या इतपत हिच मुलं अगदी भन्नाट मोठ्या माणसांसारखी वागतात, निर्णय घेतात, समजावून घेतात आणि बरेच काही. इतना बदल तो होना बनता है बॉस.

"घरोघरी मातीच्या चुली / गॅस / अशीच नवी भन्नाट पिढी". 

#similarity-everywhere #generally-similar-habits #new-gen-kids #kids-habits #new-regime #different-from-past-gen #idioms #Marathi-idioms #new-normal #new-schedule

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...