मला आठवतं तेव्हा पासून, माझ्या आईकडे आम्ही सगळेच बहुतेक भरपूर भात-आमटी, भात-उसळ, वरण-फळ, कण्या ई. खात होतो. नेहमीच्या साग्रसंगीत वरण, भात, भाजी, पोळी, कोशिंबीर ला फाटा असायचाच.
दिवाळीच्या एक दिवशी, जेव्हा आईचा हात थोडासा रिकामा आहे तेव्हा माझ्या काही मैत्रिणी, त्यांच्या बहिणी ई. येत असतं. मोठं वाडगं भरून आई टमाटो ची अप्रतिम चविष्ट अशी चटणी करायची आणि गरमागरम चकल्या. बास. आम्ही सगळ्या डायनिग टेबलवर यथेच्छ ताव मारत आणि आई बिच्चारी तळत आणि वाढत. "आन दो" अश्या पद्धतीने भरपेट फस्त होत असत चकल्या.
गणपती चे दिवस आले,स्थापना झाली कि दिड / तीन / पाच / सात आणि दहा अश्या विविध दिवशी विसर्जन झाले गणपतीचे कि त्यांचा प्रसाद भरपूर मिळत असे, दोन्ही हातांची ओंजळी भरूनच, आणि ते कित्येक वेळा, मोजून मापून नाहीच काही. बास. शेजार-पाजार, मैत्रिणी, गल्लीतले मंडळांचे ई. त्यामुळे प्रसादाला काही कमी नाहीच. वाटली डाळ, मोदक, नारळ, मुरमुरे आणि बरेच काही असायचे प्रसाद म्हणून. अहाहा. देवा. हे सगळं खाल्यावर आई कधीच मला घरी रात्रीच्या जेवणासाठी धरत नसेच, आणि अशक्यच होत ते.
माझ्या एका मैत्रिणीकडे जी अगदीच मागच्या गल्लीत राहत होती, तिच्या कडे वर्षभराचं गणपती असे. त्यांच्या कडे एक लै भारी प्रसाद जगावेगळा असा होत असे, भरपूर ओला नारळ आणि सगळ्या प्रकारचा सुकामेवा, अहाहा, मग काय विचारात, पुन्हा एकदा ओंजळ भरूनच. तसं बघायला गेलं तर प्रसाद हा अगदी थोड्या प्रमाणात घ्यायचा असतो, पण मला हि व्याख्या माहितच नव्हती. सवाल च नाही. लाज वगैरे तर नाहीच.
खास करून माझे बाबा आणि बाकी सगळेच खवैये होते त्यामुळे शनिवार रविवार अजूनच धमाल असायची. काही तरी वेगळं स्पेशल करायचे मी, आणि मग मैत्रिणी, शेजारचे ई. सगळ्यांसोबत मोठ्या प्रमाणात खाणं होत असे. त्यानंतर जेवण शक्य नसायचंच.
उन्हाळ्यात पोटभर घरी हाताने सगळ्यांनी मिळून केलेलं पॉट आईस्क्रीम असो, नाही तर दिनशॉ, त्यानंतर जेवण नाहीच. असे सगळे वेगळे दिवस होते ते. आत्ता मला समजलं / उमगलं कि मला रात्रीच्या जेवणात काही तरी वेगळं, एकच भरपेट पदार्थच का जास्त भावतो ते?. त्याच उत्तर अनेक वर्षा आधीच्या सांभाळल्या, उपभोगलेल्या अनोख्या जगावेगळ्या माझ्या खाण्याच्या सवयी.
मंगळवार, १३ जुलै, २०२१
एक पदार्थ पोटभर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा