हा माझ्या आणि माझ्या लेकीचा कालचा चर्वतिचर्वणाचा विषय होता. फारच मज्जा आली एक तरुण विचारांची मालिका ऐकतांना. अर्थात फार बदल नव्हता किंवा खूप काही वेगळं पण नव्हतं पण तिच्याशी गप्पा मारणं / चर्चा करणं हि एक पर्वणी असते माझ्या साठी, मज्जा आली.
आमच्या परिचयातली एक व्यक्ती नोकरी सोडणार आहे, राजीनामा दिला आहे आणि त्यांनी ते मला काल सांगितलं. त्यांनी का राजीनामा दिला, पुढे काय करायचं ठरवलं आहे, ह्या सगळ्या विषयावर थोडक्यात चर्चा झाली माझी, आणि मग घरी येऊन मी लेकीला सांगितलं आणि आमच्या दोघींची मैफिल ह्या विषयावर मग सुरु झाली.
जे नोकरी सोडत आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार "आता बास, नाही करायची नोकरी, पैशाची सोय केली आहे आता स्वतः साठी जगायचं" ई.
तिने मांडलेले मुद्दे, "नोकरी का करायची?".
- पैसे मिळवणे हे महत्वाचं कारण असलं तरी ते फक्त एक कारण आहे,
- जे कष्टाने शिकलो आहे ते अप्लाय करायचं म्हणून,
- अनेक लोकांना भेटून, त्यांच्या बरोबर काम करून खूप काही शिकता येत,
- रोजच एक रुटीन असत,
- एक ध्येय असत,
- अनेकदा समाजउपयोगी काम करता येत,
- मिळालेल्या अनुभवातून बाकीच्यांना मार्गदर्शन करता येत,
- तब्येत ठणठणीत राहते, ताजतवानं राहता येत रोजच्या रुटीन मुळे,
- ज्ञानात भर पडते,
- स्वातंत्र मिळत,
- कोणाशी कधी कसं वागायचं ई. समजत.... वगैरे.
नेहेमीच तिचे विचार जाणून घ्यायला किंबहुना ऐकायला प्रचंड आवडत मला.
विद्यार्थी असे पर्यंत तुम्ही कोणाचे तरी भाऊ / बहिण असता, मुलगा / मुलगी असता, कुठल्यातरी विद्यापीठाचे विद्यार्थी असता, असे कोणीतरी दिलेले लेबल, उपाधी घेऊन तुम्ही जगता. पण त्याच्या पलीकडे जी दुनिया आहे, त्या मधे तुम्ही कष्टाने कमावलेलं लेबल, हुद्दा, पद पण महत्वाचं आहे. म्हणजे फक्त कोणाची तरी बायको / नवरा अशी ओळख असण्यापेक्षा वैज्ञानिक, डॉक्टर, इंजिनिअर ई. आहे हे पण महत्वाचं किंबहुना हेच महत्वाचं.
#job #resignation #why-work #reasons-for-work #earning-money #satisfaction #application #society-benefit #designation #respect #my-daughters-views #discussion #healthy-discussion #awesome-topic #fitness #wellness
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा